मराठी प्रेक्षकांनो, खुशखबर! दादा कोंडके यांच्या स्टुडिओमध्ये पुन्हा कॅमरा रोल, महाराष्ट्राला नवं काहीतरी बघायला मिळणार?

दादा कोंडके यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. दादा कोंडकेंच्या स्टुडिओमध्ये कॅमरा रोल, साऊंड, ॲक्शनचा आवाज घुमलाय. त्यांच्या स्टुडिओतून एक नवा कोरा मराठी चित्रपट जन्म घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरु शकते.

मराठी प्रेक्षकांनो, खुशखबर! दादा कोंडके यांच्या स्टुडिओमध्ये पुन्हा कॅमरा रोल, महाराष्ट्राला नवं काहीतरी बघायला मिळणार?
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 7:02 PM

पुणे : महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाने दादा कोंडके (Dada Kondke) सारखा आवलिया नट पाहिला. दादा कोंडके यांचे प्रत्येक चित्रपट गाजले. त्यांचा अभिनय, त्यांची गाणी, त्यांचा विनोद आणि त्यांचा विनोदाची टायमिंग सगळंच भारी होतं. ते ज्या चित्रपटांची निर्मिती करायचे त्या चित्रपटात ते स्वत: मुख्य भूमिकेत दिसायचे. ते स्वत: गाणीही लिहायचे, ते स्वत: गायक सुद्धा व्हायचे. त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरायचा. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षक त्यांच्यावर आजही तितकंच प्रेम करतात. या सर्व प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दादा कोंडके यांच्या स्टुडियेतील कॅमेरा आता पुन्हा रोल होणार आहे.

आनंदाची बातमी अशी की, 30 वर्षानंतर दादा कोंडकेंच्या स्टुडिओमध्ये कॅमरा रोल, साऊंड, ॲक्शनचा आवाज घुमलाय. पुण्यातल्या भोर तालुक्यातील इंगवली या दादा कोंडकेंच्या मुळ गावी असणारा दादांचा कोंडकेंचा स्टुडिओ, त्यांच्या जाण्यानंतर गेल्या कित्येक वर्षांपासून शूटिंगच्या प्रतीक्षेत होता. आता याच स्टुडिओतून दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके यांनी ‘लेक असावी तर अशी’ या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय.

विजय कोंडके यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते उदघाट्न करत शूटिंगला सुरुवात केलीय. ‘माहेरची साडी’ या चित्रपटच्या यशानंतर, विजय कोंडके तब्बल 30 वर्षांनी पुन्हा चित्रपटाच्या मार्फत चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. ज्याप्रमाणे या मातीत शूट केलेले दादा कोंडके यांचे चित्रपट हिट ठरले, त्याचप्रमाणे या चित्रपटलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळणार असल्याचा विश्वास विजय कोंडकेंसह चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केलाय.

हे सुद्धा वाचा

चित्रपटातील प्रमुख कलाकारांची नावे :

1) विजय कोंडके, दिग्दर्शक 2) यतीन कारेकर, कलाकार 3) शुभांगी गोखले, कलाकार 4) गार्गी दातार, कलाकार 5) प्राजक्ता हणमघर कलाकार

विजय कोंडके यांनी 30 वर्षांपूर्वी माहेरची साडी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. माहेरची साडी हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे 1990 च्या काळात या चित्रपटाने तब्बल 12 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या काळात हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट त्या काळात दोन वर्षाहून अधिक काळ गाजला होता.

दादा कोंडके यांच्यासारखंच यश त्यांचे पुतणे विजय कोंडके यांना मिळतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 1990 चा काळ वेगळा होता. आताच्या परिस्थितीत भरपूर बदल झाले आहेत. प्रत्येक गोष्टीत बदल झाले आहेत. त्यामुळे आताच्या काळानुसार, नव्या पिढीच्या विचारधारेशी जुळवून घेऊन विजय कोंडके चित्रपटाची कथा कशी रंगवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.