अखेर गौतमी पाटील हिचं स्वप्न साकार, ‘घुंगरू’ सिनेमाचा टिझर लॉन्च; कसा आहे सिनेमा?

गौतमी पाटील हिचा घुंगरू या सिनेमाचा टिझर लॉन्च झाला आहे. नृत्यांगना असलेली गौतमी पाटील या निमित्ताने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या निमित्ताने अभिनेत्री होण्याचं तिचं स्वप्नही साकार झालं आहे.

अखेर गौतमी पाटील हिचं स्वप्न साकार, 'घुंगरू' सिनेमाचा टिझर लॉन्च; कसा आहे सिनेमा?
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 9:00 AM

सोलापूर : आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारी सबसे कातील गौतमी पाटील सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एखाद्या अभिनेत्रीला पाहायला उडणार नाही, एवढी झुंबड तिला पाहण्यासाठी उडत असते. एवढेच कशाला तिची एक झलक पाहण्यासाठी एवढी गर्दी होते, एवढी गर्दी होते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. इतकी लोकप्रियता आणि असा प्रसंग क्वचितच एखाद्या अभिनेत्रीच्या वाट्याला आला असेल. तिची ही लोकप्रियता पाहूनच तिला मराठी सिनेमात घेण्यात आले. मराठी सिनेमात काम करण्याची गौतमीचीही इच्छा होतीच. तिनेही सिनेमा स्वीकारला. आपल्या नृत्याच्या कार्यक्रमातून वेळ काढत काढत तिने सिनेमात काम केलं. सिनेमा पूर्ण झाला आहे. त्याचा टिझरही लॉन्च झाला आहे. त्यामुळे अभिनेत्री होण्याचं गौतमीचं स्वप्नही साकार झालं आहे. त्यामुळेच आता तिच्या नावापुढे आता अभिनेत्री ही बिरुदावलीही जोडली गेली आहे.

गौतमी पाटीलने घुंगरू या सिनेमात काम केलं आहे. हा तिचा पहिलावहिला सिनेमा आहे. या सिनेमातून ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचा टिझर लॉन्च झाला आहे. घुंगरू चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह परराज्यात आमि सोलापूर जिल्ह्यातही झालं आहे. लोककलावंताच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. बाबा गायकवाड यांनी हा सिनेमा दिगदर्शित केला आहे. या सिनेमात गौतमी पाटीलची प्रमुख भूमिका आहे. येत्या महिन्याभरात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गौतमीचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तिच्यासह तिच्या चाहत्यांना त्याची उत्सुकता लागली आहे.

हे सुद्धा वाचा

तुम्ही आम्ही कोण आहे…

टिझरच्या सुरुवातीलाच अरं लय अहंकार नका करू. सोन्याची लंका होती रावणाची. पार गेली. तुम्ही आम्ही कोण आहे… असा संवाद ऐकायला येतो. संवाद सुरू असताना शहर दाखवण्यात येतं. हा सिनेमा कलावंतांच्या जीवनावर आधारीत असला तरी त्यात गौतमी पाटीलची लव्ह स्टोरीही दाखवण्यात आली आहे. मारधाड पॅक्ड असा हा सिनेमा आहे. त्यामुळेया सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

माझ्यावर प्रेम करता तसं

आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमावर गौतमी पाटीलने यापूर्वीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोककलावंताची व्यथा मांडणारा घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी उभी आहे. माझ्यावर जसं प्रेम केलं तसं महाराष्ट्रातील चाहत्यांनी घुंगरु चित्रपट पाहून प्रेम दाखवावं. चित्रपटात अभिनय करताना अनेक अनुभव आले, असं गौतमीने म्हटलं आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.