बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा, मोठ्या पडद्यावर दिसणार ‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास!

बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती.

बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा, मोठ्या पडद्यावर दिसणार ‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास!
Pawankhind
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 1:49 PM

मुंबई : पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज 361 वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती.

प्रेक्षकांची ही आतुरता आता संपणार आहे, येत्या 31 डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची ही विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे. ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. ‘पावनखिंडीचा’ थरार दर्शविणारे चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

अष्टकातील तिसरे पुष्प

घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. शिवराज अष्टका’तील ‘पावनखिंड’ हे तिसरं पुष्प आहे.

या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार असून मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण यामुळे ‘पावनखिंड’ची शौर्यगाथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

‘जंगजौहर’ झाला ‘पावनखिंड’

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांना मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर दिग्पाल लांजेकरनं ‘जंगजौहर’ चित्रपटाच्या रूपात ‘शिवराज अष्टका’तील तिसरे पुष्प शिवचरणी अर्पण करण्याचा विडा उचलला. चित्रपटरूपी तिसरे पुष्प रसिक दरबारी सादर करायला काही अवधी असतानाच, या चित्रपटाशी निगडीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला होता. ‘जंगजौहर’ हे या चित्रपटाचं शीर्षक बदलून ते ‘पावनखिंड’ करण्यात आले होते.

‘जंगजौहर’पेक्षा ‘पावनखिंड’ हे शीर्षक चित्रपटाच्या विषयाला अनुरूप

‘जंगजौहर’पेक्षा ‘पावनखिंड’ हे शीर्षक चित्रपटाच्या विषयाला अनुरूप आणि पूरक वाटल्यानं दिग्पाल आणि निर्मात्यांनी जणू शिवरायांचा प्रसाद मानून हे शीर्षक आपल्या चित्रपटाला बहाल केले आहे. शिवप्रेमींसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. आता हा चित्रपट ‘पावनखिंड’ या नावाने प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण यामुळे दिग्पालच्या व्हिजनमधून पडद्यावर अवतरणारी ‘पावनखिंड’ची शौर्यगाथा प्रेक्षकांनाही खिळवून ठेवेल असा विश्वास आहे. ‘ते फकस्त 600 व्हते’ असे म्हणत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा प्रेक्षकांना आता ‘पावनखिंड’ या नावाने पहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

उफ्फ तेरी अदा…मौनी रॉयने सोशल मीडियावर शेअर केले ‘इनसाइड द बेडरूम’ फोटो!

Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’मध्ये वाईल्ड कार्ड बनून एंट्री केलेले अभिजीत बिचुकले कोरोनाच्या विळख्यात!

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.