‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’, ‘डॉक्टर’ बनले गीतकार-संगीतकार! अंकुर शर्मांचे गाणे ‘हम तेरे ही हो जाएंगे’ प्रेक्षकांच्या भेटीला!

दररोजच्या चाकोरीबद्ध जगण्यातून स्वतःची आवड जोपासणं सोपं नाही. पण डॉ. अंकुर शर्मा हे अशा मोजक्या लोकांपैकी एक आहेत ज्यांनी आपला व्यवसाय आणि आवड दोन्हीही समान उत्साहाने जपल्या आहेत.

'लॉकडाऊन की लव्ह स्टोरी', ‘डॉक्टर’ बनले गीतकार-संगीतकार! अंकुर शर्मांचे गाणे 'हम तेरे ही हो जाएंगे' प्रेक्षकांच्या भेटीला!
Ankur Sharma
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 8:39 AM

मुंबई : दररोजच्या चाकोरीबद्ध जगण्यातून स्वतःची आवड जोपासणं सोपं नाही. पण डॉ. अंकुर शर्मा हे अशा मोजक्या लोकांपैकी एक आहेत ज्यांनी आपला व्यवसाय आणि आवड दोन्हीही समान उत्साहाने जपल्या आहेत. व्यवसायाने डॉक्टर आणि आवड-पॅशन म्हणून संगीतकार तसंच दिग्दर्शक असलेले डॉ. अंकुर शर्मा त्यांच्या गाण्यांसह सिनेसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.

‘हम तेरे ही हो जाएंगे’ हे डॉ. अंकुर शर्मा यांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलेलं गाणं 25 ऑक्टोबर रोजी रिलीज झालं आहे. विशेष म्हणजे, डॉ. अंकुर शर्मा यांनी आजवर सुमारे 1000 गाणी लिहिलेली आहेत. त्यांची सर्वोत्तम अशी 10 गाणीही लवकरच रिलीज होणार आहेत. त्यांचा ‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’ हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. स्वत:च्या या प्रवासाबद्दल बोलताना डॉ. अंकुर म्हणाले, “हा खरोखरच माझा बॉलिवूडमधला प्रवेश आहे. मी अनेक गीतं लिहिली, संगीतबद्ध केली. दिग्दर्शन आणि अभिनयही केला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर मी काम करायला लागलो आणि सध्या मी अजमेरच्या जेएलएन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय प्रॅक्टिस करतोय. संगीताविषयीचं कोणतंही औपचारिक शिक्षण मी घेतलेलं नाही, पण पॅशनमुळेच मी संगीतमार्गावर वाटचाल करू शकलो. ख्यातनाम संगीतकारांच्या रचना मी अत्यंत काळजीपूर्वक बघितल्या- अभ्यासल्या. वैद्यकीय प्रॅक्टिस करत असतानाच मी गाणी लिहायचो, ती संगीतबद्ध करायचो, कॉलेजमधील कार्यक्रमांमध्ये मित्रांसोबत ती सादरही करायचो.”

कुटुंबाने दिला पाठींबा

ते पुढे म्हणाले की, “कुटुंबीयांचा सहभाग आणि सहकार्याशिवाय माझी ही संगीत आराधना कधीही पूर्ण होऊ शकली नसती. त्यांनी निर्मितीत मला मदत केली आहे. कुटुंबातील सदस्यांपैकी कुणी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी पार पाडून मला सहकार्य केले आहे.”

“हम तेरी ही हो जाएंगे’ हा एक तीन भागांतील लव्ह सीक्वेन्स आहे. पहिला भाग हा रोमॅंटिक ट्रॅक असून तो 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय, तर इतर दोन सीक्वेल्स काही दिवसांनंतर प्रदर्शित होणार आहेत. गीत मालिकेची निर्मिती करुन दर्शकांना संपूर्ण गोष्टच संगीतासह सांगायची असा एक नवीन ट्रेंड मला बॉलिवूडमध्ये निर्माण करायचा आहे”, हे सांगताना डॉ.अंकुर शर्मा यांच्या नजरेत एक वेगळीच चमक दिसत होती. देशातला ख्यातनाम पार्श्वगायक जावेद अलीने हे गाणं गायलं असून, या रोमँटिक गाण्यात त्याने त्याचं ह्रदयच ओतलं आहे. त्याचा आवाज सर्वच लोकांच्या आत्म्याला निश्चितच भिडेल, असंही डॉ. अंकुर यांनी सांगितलं.

आशा सोडू नका!

“करोना महासाथीचे दिवस जगभरातल्या प्रत्येकासाठी वाईट होते. मी काही त्याला अपवाद नाही. पण संगीत आणि संगीतनिर्मितीची प्रक्रिया यांनीच मला या कठीण दिवसांत जगण्याचं बळ दिलं”, असं सांगतानाच डॉ. अंकुर म्हणाले, “आशा सोडू नका अशी माझी प्रत्येकाला विनंती आहे, कारण बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहेच!”

हेही वाचा :

Aryan Khan Drug Case : आधी शाहरुख, आता गौरी खान लेक आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये!

Bunty Aur Babli 2 Trailer : ‘बंटी’ आणि ‘बबली’चा डबल धमाका, राणी-सैफसह सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ दिसणार मुख्य भूमिकेत!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.