AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विठ्ठल शिंदेंना साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी, काय म्हणाले बाबासाहेब?; वाचा, किस्सा!

गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे यांची कारकिर्द भली मोठी आहे. या कारकिर्दीत त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. अनेकांनी कौतुक केलं. (dr. babasaheb ambedkar felicitated folk singer vitthal shinde, read story)

विठ्ठल शिंदेंना साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी, काय म्हणाले बाबासाहेब?; वाचा, किस्सा!
Vitthal Shinde
| Updated on: Mar 17, 2021 | 4:27 PM
Share

मुंबई: गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे यांची कारकिर्द भली मोठी आहे. या कारकिर्दीत त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. अनेकांनी कौतुक केलं. पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कौतुक हा त्यांच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार होता. विठ्ठल शिंदे बाबासाहेबांना नेमके कुठे भेटले? बाबासाहेबांनी त्यांचं कौतुक कुठे केलं? नेमका काय होता हा किस्सा? वाचा, 2007 साली विठ्ठल शिंदे यांनी सांगितलेला हा किस्सा… (dr. babasaheb ambedkar felicitated folk singer vitthal shinde, read story)

दीड हजार गीते गायली

विठ्ठल शिंदे यांनी सर्व प्रकारची मिळून तब्बल पाचशेच्यावर गाणी लिहिली आहेत. सुमारे दीड हजार गाणी गायली आहेत आणि दोन हजारांच्यावर गीते संगीतबद्ध केली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांवरील अनेक गीतेही त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्यांची बाबासाहेबांवरील अनेक गीते गाजली असून आजही आंबेडकर जयंतीत ही गीते वाजली जातात.

बाबासाहेब कलावंतांबाबत काय म्हणायचे?

बाबासाहेब आंबेडकर यांना कलावंतांबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. माझी दहा भाषणं तर कलावंताचं एक गाणं बरोबरीचं आहे, असं बाबासाहेब नेहमी म्हणायचे. विठ्ठल शिंदे यांना 1951मध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला होता.

टाळ्यांचा कडकडाट अन् बाबासाहेब जिंदाबाद

1951मधला हा किस्सा आहे. तेव्हा वरळीत बाबासाहेब आंबेडकरांची सभा होती. सभेपूर्वी गायनाचा कार्यक्रम होता. कार्यकर्त्यांनी शिंदेंना तासभर गाणं गायला सांगितलं. सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. शिंदेंनी गायनास सुरुवात केली. पाच गाणी झाली असतील. तेवढ्यात बाबासाहेबांची गाडी सभास्थळी आली आणि कार्यकर्त्यांची एकच लगबग सुरू झाली. बाबासाहेब येताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. बाबासाहेब जिंदाबादच्या घोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला. अचानक टाळ्या आणि घोषणांची आतषबाजी सुरू झाल्याने शिंदे यांनीही लोक आता भाषण ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत हे हेरून आवराआवर सुरू केली.

बाबासाहेब म्हणाले, तुम्ही गात होता? आगे बढो!

बाबासाहेब स्टेजवर आले. स्टेजवर सर्व कार्यकर्ते उभे होते. त्यावेळी बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना विचारलं, स्टेजवर गाणं कोण गात होतं? कुणी तरी सांगितलं विठ्ठल शिंदे. त्यानंतर बाबासाहेबांनी मला जवळ बोलावलं. तुम्ही गात होता? तुमचा आवाज खूप चांगला आहे. आगे बढो, असं म्हणत बाबासाहेबांनी माझ्या पाठिवर कौतुकाची थाप मारली. त्यानंतर बाबासाहेबांनी मला आणखी एक गाणं गायला सांगितलं. त्यामुळे मी भारावून गेलो आणि मला हुरूप आला. मी आणखी एक गाणं तन्मतेयनं गायलो, असं शिंदे सांगतात.

माझी जिंदगी बदलली

बाबासाहेबांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. या कौतुकाच्या थापेमुळेच मी मोठा झालो. माझी जिंदगी बदलली, असं शिंदे म्हणाले. (साभार, आंबेडकरी कलावंत) (dr. babasaheb ambedkar felicitated folk singer vitthal shinde, read story)

संबंधित बातम्या:

लतादीदींनी गाणं थांबवलं, धीर दिला अन्…; वाचा, गायक विठ्ठल शिंदेंनी सांगितलेला किस्सा!

वाचता येत नव्हतं, तरीही ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ गायल्या; रोशन सातारकरांचा हा किस्सा माहीत आहे का?

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

(dr. babasaheb ambedkar felicitated folk singer vitthal shinde, read story)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.