Video | नाकात नथ, गळ्यात ठुशी, नऊवारी साडी! मराठमोळा साज लेऊन राजेश्वरी खरातची गणपती बाप्पाला नृत्यवंदना! पाहा व्हिडीओ

नुकतेच सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सगळेच आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेत गुंग झाले आहेत. अशावेळी ‘शालू’ कशी मागे राहील बरं! ‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)  हिने देखील पारंपारिक वेशात आणि मराठी साज लेऊन गणपती बाप्पाची आराधना केली आहे.

Video | नाकात नथ, गळ्यात ठुशी, नऊवारी साडी! मराठमोळा साज लेऊन राजेश्वरी खरातची गणपती बाप्पाला नृत्यवंदना! पाहा व्हिडीओ
Rajeshwari Kharat
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 1:17 PM

मुंबई : नुकतेच सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सगळेच आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेत गुंग झाले आहेत. अशावेळी ‘शालू’ कशी मागे राहील बरं! ‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)  हिने देखील पारंपारिक वेशात आणि मराठी साज लेऊन गणपती बाप्पाची आराधना केली आहे. ‘एकदन्ताय वक्रतुंडाय…’ या गाण्यावर राजेश्वरीने छोटसं सादरीकरण केलं आहे.

राठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

राजेश्वरी खरात हिने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राजेश्वरी ‘एकदन्ताय वक्रतुंडाय…’ या गणेश वंदनेवर नृत्य करताना दिसत आहे. लाडक्या ‘शालू’चा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यातही नाकात नथ, गळ्यात ठुशी आणि नऊवारी साडी असा राजेश्वरीचा लूक चाहत्यांना भुरळ घालतो आहे.

पाहा व्हिडीओ

शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खराचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

राजेश्वरीच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

राजेश्वरी खरातच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते. त्यामुळे तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये अहमहमिका रंगलेली असते. चाहते आपल्या लाडक्या शालूचे फोटोही मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वॉलवर शेअर करतात. त्यामुळे तिच्या फोटोवरील कमेंटमधल्या ‘शेरां’सोबत सव्वाशेरांनी केलेल्या शेअर्सची संख्याही सव्वाशेच्या घरात जाते.

‘फँड्री’नंतर प्रचंड बदलली शालू!

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता, मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

चित्रपटात राजेश्वरीच्या वाट्याला जास्त डायलॉग आले नसले तरी, तिने तिच्या नजरेनेच सगळ्यांची मने जिंकली होती. तिच्या चेहऱ्यावरील सहज अभिनय चाहत्यांना भावला होता. चित्रपटात जब्याप्रमाणे शालूच्या भूमिकेला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु, तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र इतक्या काळानंतर ती बदलेल्या अवतारात पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर आली आहे.

हेही वाचा :

Sidnaaz : शेवटच्या म्युझिक व्हिडीओ दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाजची धमाल, अनसिन फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल

काहीशी खट्याळ… तर काहीशी मिष्किल… क्यूट आणि स्विटही… श्रिया सरन आणि आंद्रेईचा रोमँटिक अंदाज पाहाच!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.