गौतमी पाटील हिच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘घुंगरू’ चित्रपट रखडला; कारण वाचाल तर…

राजकीय घडामोडींचा सिनेमावर परिणाम होऊ नये, प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवू नये म्हणून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या राजकीय घडामोडीत गौतमीच्या सिनेमाची चर्चा होणार नाही.

गौतमी पाटील हिच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'घुंगरू' चित्रपट रखडला; कारण वाचाल तर...
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 7:45 AM

मुंबई : आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत झालेल्या गौतमी पाटीलचे कार्यक्रम सध्या थांबलेले आहेत. पावसामुळे गौतमीच्या कार्यक्रमांना ब्रेक बसला आहे. गौतमीने गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात आपल्या अदाकारीने धुमाकूळ घातला होता. सर्वात व्यस्त कलाकार म्हणूनही ती पुढे आली होती. गौतमीचे कार्यक्रम म्हणजे गर्दी… गर्दी… आणि गर्दी… गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, टाळ्या, शिट्ट्या, हुल्लडबाजी, पोलिसांचा लाठीमार हे ठरलेलंच आहे. चाहत्यांच्या हुल्लडबाजीमुळे तर गौतमीचा कार्यक्रम कित्येकवेळा मध्येच थांबवावा लागला आहे. गौतमीची ही प्रचंड क्रेझ असल्यामुळेच तिला सिनेमाची ऑफर आली होती. तिने ती ऑफरही स्वीकारली. सिनेमा पूर्णही झालाय. पण सध्या तिच्या सिनेमाचं प्रदर्शन एका कारणामुळे रखडलं आहे.

गौतमी पाटीलने घुंगरू या सिनेमात काम केलंय. सिनेमातील तिचा हा पहिलाच अभिनय आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावरील तिची अदाकारी पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाची गौतमीलाही उत्सुकता आहे. गौतमीने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून हा सिनेमा पूर्ण केला आहे. सिनेमा तयारही झाला आहे. मात्र, सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. पावसाच्या दिवसामुळे किंवा महागाईच्या फटक्यामुळे गौतमीच्या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

राजकीय घडामोडींचा परिणाम

गौतमीच्या सिनेमाचं प्रदर्शन रखडण्याचं कारण मोठं मनोरंजक आहे. सध्या महाराष्ट्रात प्रचंड राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. वयाच्या 84व्या वर्षी शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी नाशिकमधून सभांना सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण मीडियाचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष सध्या राजकारणाकडेच लागलेलं आहे.

नवीन तारीख कळवणार

राज्यातील या राजकीय घडामोडीचा गौतमीच्या सिनेमावर परिणाम झाला आहे. या राजकीय घडामोडींमुळेच गौतमीच्या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं आहे. राजकीय घडामोडींचा सिनेमावर परिणाम होऊ नये, प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवू नये म्हणून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

या राजकीय घडामोडीत गौतमीच्या सिनेमाची चर्चा होणार नाही. त्याचा फटका सिनेमाला बसू शकतो, अशी भीती असल्यानेच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची तारीख पुढे ढकलली जात आहे. नवी तारीख लवकरच कळवू असं सिनेमाचे दिग्दर्शक बबाब गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या सिनेमाच्या नव्या तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.