Video: ‘कच्चा बदाम नाही, शिवरायांच्या महाराष्ट्राची लेक’; ‘पावनखिंड’च्या गाण्यावर चिमुकलीचा डान्स

पावनखिंड या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Video: 'कच्चा बदाम नाही, शिवरायांच्या महाराष्ट्राची लेक'; 'पावनखिंड'च्या गाण्यावर चिमुकलीचा डान्स
child's dance on Pawankhind songImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 11:34 AM

मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी आणि मराठी रसिक गर्दी करत आहेत. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सिनेमागृहांमध्ये ‘पावनखिंड’च्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, अक्षय वाघमारे, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी, वैभव मांगले यांसारख्या कलाकारांची मोठी फौजच या चित्रपटात पहायला मिळतेय. सध्या सोशल मीडियावर आणि संपूर्ण महाराष्ट्रात याच चित्रपटाला मिळालेल्या यशाची चर्चा आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ‘पावनखिंड’ या चित्रपटातील एका गाण्यावर चिमुकली डान्स करताना पहायला मिळतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Marathi Movie)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ या गाण्याची क्रेझ पहायला मिळाली. कच्चा बदाम या गाण्यावर अनेकांनी इन्स्टा रिल्स व्हिडीओ बनवून पोस्ट केले. एकीकडे कच्चा बदामचा ट्रेंड सुरू असताना पावनखिंडमधील गाण्यावर नाचणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ पोस्ट करत चिन्मयने लिहिलं, ‘कच्चा बदाम नाही, शिवरायांच्या महाराष्ट्राची लेक’! चिन्मयने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘हे बघून वाटतं की तुम्ही आजच्या आणि पुढच्या पिढीसाठी खूप काही देत आहात आणि पुढेसुद्धा देणार’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावनखिंड या चित्रपटाचा परिणाम कसा झाला, हे यातून पहायला मिळत आहे. आणखी काय हवंय’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हे तिसरं चित्रपट आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळं प्रदर्शनापासून वंचित राहिलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. या चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यात 15 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.

संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’ची यशस्वी घोडदौड; वीकेंडला कमावले तब्बल इतके कोटी रुपये

संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’चा अनोखा विक्रम; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

संबंधित बातम्या: ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य; चित्रपट पाहणाऱ्यांना मिसळवर डिस्काऊंट

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.