Heennaa Panchaal | ‘ती निर्दोष असल्याने, कोणाचीही भीती नाही’, ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या हीना पांचाळला बहिणीचा पाठींबा

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला (Heennaa Panchaal) पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Nashik Igatpuri High Profile Rave Party) टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी हीनासह 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Heennaa Panchaal | ‘ती निर्दोष असल्याने, कोणाचीही भीती नाही’, ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या हीना पांचाळला बहिणीचा पाठींबा
हीना पांचाळ
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 1:37 PM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला (Heennaa Panchaal) पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Nashik Igatpuri High Profile Rave Party) टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी हीनासह 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी (26 जून) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती (Heennaa Panchaal sister support to actress who is in custody in a drug case).

आता हीनाच्या आई आणि बहिणीने या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बहीण म्हणाली, ‘हीना आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेली होती. जाण्याआधी तिने आईची परवानगी देखील घेतली होती. सगळं काही ठीक आहे म्हणून ती गेली होती. यानंतर आम्ही हीनाबद्दलच्या बातम्या वाचल्या. पण, सर्वात जास्त त्रासदायक म्हणजे यात फक्त हीनाचे नावच पुढे आले. जे माझ्या बहिणीला ओळखत नाहीत, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नये. जे तिला ओळखतात त्यांच्यावरच विश्वास ठेवावा.’

‘जेव्हा मी माझ्या बहिणीशी बोलले तेव्हा तिने सांगितले की पार्टीत काहीतरी झाले, पोलीस आले. पण इतकी मोठी बाब घडली हे मला माहित नव्हते. मीडियाने जे बोलते त्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही, आमचा तिच्यावर विश्वास आहे की, ती असे काही करू शकत नाही आणि सध्या आमचे लक्ष हिनाला तुरूंगातून बाहेर काढण्यावर आहे.’

हीनाच्या आईची प्रतिक्रिया

हीनाची आई म्हणाली, ‘मला हे कळताच मोठा धक्का बसला. पण मला माहित आहे, हीना असं करू शकत नाही कारण ती तशी नाही. त्याचे मित्र तसे असतील. या तणावामुळे हीनाच्या वडिलांची तब्येतही खालावली.’

पोलीस स्टेशनमध्ये हीनाला भेट घेत तिची बहिण म्हणाली की, ‘जेव्हा मी हीनाला भेटले, तेव्हा ती खूप भावनिक झाली होती, पण हिना खूपच खंबीर आहे. तिने मला सांगितले की, जेव्हा मी काहीही चूक केली नाही तेव्हा घाबरायची काहीच गरज नाही.’

कधी मिळेल जामीन?

हीना पांचाळच्या बहिणीने सांगितले की, आम्ही जामीन अर्ज दाखल केला आहे, परंतु अद्याप त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. हिनाची चाचणी केली गेली होती आणि त्याचा अहवाल नकारात्मक आला आहे, परंतु आम्हाला तो अहवाल अद्याप मिळालेला नाही. मी या प्रकरणाबद्दल बरेच ऐकले आहे, कारण लॉकडाऊन दरम्यान या लोकांच्या फार्महाऊसमध्ये वाढदिवसाची पार्टी होती आणि म्हणूनच त्यांना अटक केली गेली.

(Heennaa Panchaal sister support to actress who is in custody in a drug case)

हेही वाचा :

इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांची रेव्ह पार्टी

हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, दिग्गज अभिनेत्रींसह बॉलिवूड कोरिओग्राफर पोलिसांच्या ताब्यात

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.