Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कारभारी दमानं… होऊ द्या दमानं’चा कारभारी कोण माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा

आपण बालपणी ऐकलेली अनेक गाणी आपण गुणगुणत असतो. त्या गाण्यांवर थिरकतही असतो. बऱ्याचदा ती गाणी गाणारे गायक आपल्याला माहीत असतात. (how made karbhari daman lavani, read story)

'कारभारी दमानं... होऊ द्या दमानं'चा कारभारी कोण माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा
madhukar ghusale
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 4:33 PM

मुंबई: आपण बालपणी ऐकलेली अनेक गाणी आपण गुणगुणत असतो. त्या गाण्यांवर थिरकतही असतो. बऱ्याचदा ती गाणी गाणारे गायक आपल्याला माहीत असतात. पण ती गाणी लिहिणारे गीतकार आपल्याला माहीतच नसतात. आता हेच पाहा ना, ‘कारभारी दमानं… होऊ द्या दमानं…’ ही लावणी माहीत नाही, असा एकही व्यक्ती महाराष्ट्रात नाही. पण या गाण्याचा गीतकार कुणालाच माहीत नाही. कोण आहेत या गीताचे गीतकार? हे गाणं कसं तयार झालं? हे गाणं पहिलं कुणाच्या आवाजात गायलं गेलं? त्याचाच हा किस्सा… (how made karbhari daman lavani, read story)

कोण आहेत मधुकर घुसळे

‘कारभारी दमानं… होऊ द्या दमानं…’ हे गाणं मधुकर घुसळे यांनी लिहिलं आहे. नाशिकच्या येवले तालुक्यातील शेवगंसतारा हे त्यांचं मूळ गाव. मात्र गेल्या दोन पिढ्यांपासून घुसळे कुटुंबीय मुंबईतच राहतात. कल्याणच्या वालधुनी परिसरात त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ गेला. त्यानंतर ते कल्याणच्या वरप गावात राह्यला गेले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते. स्वत: घुसळेही रेल्वेतून निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी शिक्षिका आणि नर्स होत्या. घुसळे यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. मुलगा संदीप शिक्षक आहे. तर प्रदीप रिक्षा चालवतो. नॉन मॅट्रीक असलेल्या घुसळे यांनी मुलांना मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं. घुसळे हे अफाट प्रतिभेचे धनी होते. त्यांच्या लेखनीतून अप्रतिम गाणी उतरली आहेत. 9 ऑगस्ट 2020 मध्ये वयाच्या 72व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यापूर्वी त्यांनी विशेष मुलाखत देऊन त्यांच्या गाण्यांचा प्रवास उलगडला होता.

प्रल्हाद शिंदेंनी गायलं, पण

मधुकर घुसळे यांनी ‘कारभारी दमानं… होऊ द्या दमानं…’ हे गाणं लिहिल्यानंतर त्यांना हे गाणं लावणी सम्राज्ञी यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचं होतं. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या सांगण्यावरून ते पुण्यालाही गेले होते. पण रोशनबाईंचा शो सुरू होता. त्यामुळे त्या रेकॉर्डिंगला येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सर्व प्रथम हे गाणं स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. पण हे गाणं चाललं नव्हतं.

रोशनबाईंनी गाण गायलं आणि…

त्यानंतर काही महिन्यांनी घुसळे यांच्या पश्चात रोशन सातारकर यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. पण गाणं रेकॉर्ड करताना त्याची चाल बदलली आणि गाणं हिट झालं. त्यामुळे कॅसेटचा प्रचंड खप झाला, असं घुसळे यांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा सांगितलं होतं.

लावणीत चुकीचे शब्द

घुसळे यांच्या पश्चात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आल्याने गाण्यात चुकीचे शब्दही वापरण्यात आले आहेत. त्यामुळे हे गाणं आजही चुकीच्या पद्धतीने गायलं जातं. या गाण्यात ‘मोडली पाठीची कमान’ अशी ओळ आहे. घुसळे यांच्या मते या ओळी चुकीच्या आहेत. ‘पाठीची कमान’ कधीच नसते. त्याऐवजी ‘कमरेची कमान’ असा शब्दप्रयोग असायला हवा होता, असं ते सांगतात. (साभार, आंबेडकरी कलावंत) (how made karbhari daman lavani, read story)

संबंधित बातम्या:

टिनपाटच्या डब्यावर ताल शिकले, इराण्याच्या हॉटेलबाहेर गाणं; असे घडले विठ्ठल शिंदे!

‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ कसं सूचलं?; वाचा रंजक किस्सा!

‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ कसं सूचलं?; वाचा रंजक किस्सा!

विठ्ठल शिंदेंना साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी, काय म्हणाले बाबासाहेब?; वाचा, किस्सा!

(how made karbhari daman lavani, read story)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.