Godavari Official Release Announcement | जितेंद्र जोशी-गौरी नलावडेचा ‘गोदावरी’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते निर्माते जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांनी निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' या त्यांच्या आगामी चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण केले आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी ट्विटरवर जाहीर केले की जितेंद्र जोशी आणि गौरी नलावडे स्टारर 'गोदावरी' 3 डिसेंबर 2021 रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते निर्माते जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांनी निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या त्यांच्या आगामी चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण केले आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी ट्विटरवर जाहीर केले की जितेंद्र जोशी आणि गौरी नलावडे स्टारर ‘गोदावरी’ 3 डिसेंबर 2021 रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आज (29 सप्टेंबर) प्रियदर्शन जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली. प्रियदर्शनने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, ‘गोदावरी येते आहे 3 डिसेंबर 2021ला आमच्या कुटुंबाची गोष्ट पहा तुमच्या कुटुंबियांसोबत. फक्त चित्रपटगृहात.. odgodavarithefilm #Godavari #ReleasinginDecember #3 December 2021 Blue Drop Films & Jitendra Joshi Pictures Presents ‘. अभिनेत्याच्या या पोस्टवर प्रेक्षक, चाहते आणि अनेक सह-कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा पोस्ट :
*Twitter*
गोदावरी येते आहे ३ डिसेंबर २०२१ ला आमच्या कुटुंबाची गोष्ट पहा तुमच्या कुटुंबियांसोबत. फक्त चित्रपटगृहात.@godavarithefilm #Godavari #ReleasinginDecember #3rdDecember2021 Blue Drop Films & Jitendra Joshi Pictures Presents A @iamnm Picture#SwaroopStudios pic.twitter.com/60S6bsHS8n
— Priyadarshan Jadhav (@prizadhavv) September 29, 2021
निखिल महाजन दिग्दर्शित “गोदावरी” या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशीसोबत संजय मोने, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव आणि गौरी नलावडे सारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या दोन मिनिटांच्या ट्रेलरची सुरुवात मुख्य पात्र साकारणाऱ्या जितेंद्र जोशी पासून झाली आहे, जो त्याच्या स्थिर, नियमित जीवनामुळे वैतागला आहे आणि संतापला देखील आहे.
बहुप्रतीक्षित चित्रपट
माध्यम अहवालानुसार, जितेंद्र जोशीचा आगामी चित्रपट ‘गोदावरी’ हा 2021 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. महाराष्ट्र सरकारने चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यामुळे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि निर्मात्यांसह संपूर्ण चित्रपटसृष्टी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख लॉक करत आहे आणि लगोलग शेअर करत आहेत.
थिएटर अनलॉक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 ऑक्टोबरपासून सर्व सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्स उघडण्याची घोषणा केली आहे. बॉलिवूड इंडस्ट्री या घोषणेने खूप खूश आहे. कारण प्रत्येकजण आपले चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी बराच काळ वाट पाहत होता. दुसरीकडे, रविवारी, अनेक निर्मात्यांनी आणि कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली, जे आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
‘भवाई’ ठरणार पहिला चित्रपट
या यादीनुसार, चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणारा पहिला चित्रपट म्हणजे ‘भवाई’. भवाई 10 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. ‘भवाई’ एक रोमँटिक ड्रामा आहे, ज्यामध्ये प्रतिक गांधी, इंद्रिता रे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे नाव आधी ‘रावण लीला’ असे होते, परंतु नावासंदर्भात झालेल्या वादानंतर या चित्रपटाचे नाव बदलून भवाई असे करण्यात आले.
दिवाळीला ‘सूर्यवंशी’
अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी यंदाची दिवाळी खूप खास असेल. कारण अभिनेत्याचा बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये रिलीज होणार होता, परंतु कोविडमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. यानंतर बऱ्याच वेळा असे वृत्त आले होते की, हा चित्रपट OTT वर रिलीज होईल, पण प्रत्येक वेळी ही अफवा ठरली होती आणि आता शेवटी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास तयार आहे.
तथापि, सूर्यवंशी व्यतिरिक्त ‘नो मीन्स नो’ देखील दिवाळीलाच रिलीज होत आहे. गुलशन ग्रोव्हर, एना अडोर, अरमान कोहली या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :
Binge Watch : ‘शिद्दत’ ते ‘ब्रेक पॉईंट’, पाहा या आठवड्यात OTTवर मनोरंजनाच्या मेजवानीत काय काय असणार?
Nikki Tamboli : बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळीने स्टायलिश साडीत केला कहर, बोल्ड लूकनं चाहते झाले वेडे