‘खंडोबा रायाचं याड बाई…’, ‘म्हातारा नवरा गंमतीला…’ ‘कशाचं खरं खोटं…’ या गाण्यांचा गीतकार माहीत आहे का?

लोकगीतं लिहिणारे जे गीतकार आहेत त्यामध्ये दामोदर शिरवाळे यांचं स्थान खूप वरचं होतं. (know about damodar shirwale's hit marathi songs)

'खंडोबा रायाचं याड बाई...', 'म्हातारा नवरा गंमतीला...' 'कशाचं खरं खोटं...' या गाण्यांचा गीतकार माहीत आहे का?
damodar shirwale
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 5:19 PM

मुंबई: लोकगीतं लिहिणारे जे गीतकार आहेत त्यामध्ये दामोदर शिरवाळे यांचं स्थान खूप वरचं होतं. शिरवाळे यांनी अनेक लोकप्रिय गीतं लिहिली आहेत. शेजारीण बाई तुमचा टीव्ही… म्हातारा नवरा गंमतीला… कशाचं खरं खोटं पिकतंय रं… आदी लोकप्रिय गीते त्यांच्या लेखनीतून उतरली आहेत. त्याचेच हे किस्से… (know about damodar shirwale’s hit marathi songs)

रोशन सातारकरांचा दमदार आवाज

मनात हाय आता सांगू मी काय, कशी काय येऊ मी रंगतीला, म्हातारा नवरा गंमतीला…

हे गाणं दामोदर शिरवाळे यांनी लिहिलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी रोशन सातारकरांनी हे गाणं गायलं. या गाण्याने त्याकाळात संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आजही हे गाणं तितकच लोकप्रिय आहे.

लय झाली गं जीवाची दैना, चल नांदाया मैना, घरी म्हातारी दळण दळी, आणि म्हातारा मेंढरं वळी, तुझ्या वाचून मजला व्हयना, चल नांदाया मैना…

शिरवाळे यांचं हे गीत पांडुरंग वनमाळी यांनी गायलं होतं. हे गाणंही त्याकाळी खूप लोकप्रिय झालं होतं.

आकाशवाणीवर 15 वर्षे गाजवले

शिरवाळे यांनी आकाशवाणीवर सलग 15 वर्षे कार्यक्रम केले. ते आकाशवाणीचे बी ग्रेडचे गायक होते. त्यांना पाच वर्षे विमल जोशी आणि सात वर्षे यशवंत देव बॉस होते. शिरवाळे यांनी आकाशवाणीवर प्रामुख्याने बाळहरी झेंडे आणि आप्पा कांबळेंची गाणी गायली.

येळ झाला ओरडून कोंबडं, उठा धनी फुटलं तांबडं, आता तरी बिगीनं करा, दूर घोंगडं, उठा धनी…

दिवगंत बाळहरी झेंडेंच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं शिरवाळे यांनी आकाशवाणीवर चांगलंच गाजवलं.

प्रल्हाद शिंदेंचे बुवा

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे आणि शिरवाळे यांचा 35 वर्षाचा दोस्ताना होता. प्रल्हाद शिंदे तर त्यांना प्रेमाने बुवा म्हणून हाक मारायचे. त्यांनी त्यांची जास्तीत जास्त गाणी प्रल्हाद शिंदे यांना गायला दिली आहेत. प्रल्हाद शिंदेंनी गायलेलं त्यांचं एक गीत प्रचंड लोकप्रिय झालं होतं. ते गाणं होतं…

कशाचं खरं खोटं पिकतंय रं, गेलं ते असली, नकली विकतंय रं….

शिरवाळेंची इतर लोकगीतं

शिरवाळे यांनी अनेक लोकगीतं लिहिली आहेत. अनेक गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. त्यांची काही लोकगीतं तर आजही लोकप्रिय आहेत. त्यातील काही लोकगीते अशी…

खंडोबा रायाचं याड बाई लागलं, मुरळीला, लागलं मुरळीला, याड बाई लागलं वाघ्याला…

आणि

नाही नुसतीच पोळी मधाची, बायकोसाठी खरी जीवनाची…

आणि

घाईन जाऊन लाईन लावून, तिकीट काढायचं, या वेडीला मनकवडीला माहेरी धाडायचं….

आणि

आला भेटाया पाव्हणा, खायला मागतो कोंबडं, लय लाडाचा पाव्हणा, बसाया टाका घोंगडं… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about damodar shirwale’s hit marathi songs)

संबंधित बातम्या:

‘शेजारीण बाई, तुमचा टीव्ही…’ हे गाणं तीन गीतकारांनी लिहिलंय हे माहीत आहे का?

‘लिंबू मला मारीला गा, लिंबू मला मारीला…’ या गाण्यासह दीपशाम मंगळवेढेकरांची गाजलेली गाणी माहिती आहेत का?

आनंद शिंदेंचं ‘नवं नवं लुगडं…’ हे गाणं लंडनच्या हॉलमध्येही गाजलं; या गाण्याचे गीतकार कोण?; हा किस्सा वाचाच!

(know about damodar shirwale’s hit marathi songs)

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.