आनंद शिंदेंच्या ‘नवीन पोपटा’ इतकंच सुषमादेवींचं ‘हे’ गाणंही लोकप्रिय; गाण्याचा किस्साही लाजवाब, वाचाच!

भीम कोकिळा म्हणून आंबेडकरी समाजात ओळख असलेल्या सुषमादेवींनी अनेक दर्जेदार भीमगीतं गायली आहेत. त्यांची अनेक भीमगीतं लोकप्रिय आहेत. (know about sushma devi and her famous songs)

आनंद शिंदेंच्या 'नवीन पोपटा' इतकंच सुषमादेवींचं 'हे' गाणंही लोकप्रिय; गाण्याचा किस्साही लाजवाब, वाचाच!
sushmadevi
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 5:38 PM

मुंबई: भीम कोकिळा म्हणून आंबेडकरी समाजात ओळख असलेल्या सुषमादेवींनी अनेक दर्जेदार भीमगीतं गायली आहेत. त्यांची अनेक भीमगीतं लोकप्रिय आहेत. त्यांचं एक गाणं तर गेल्या चाळीस वर्षांपासून आजही गाजतंय. आनंद शिंदे यांच्या ‘नवीन पोपटा’ने जसं लोकांना वेड लावलं तसंच सुषमादेवींच्या या गाण्यानेही लोकांना वेड लावलेलं आहे. (know about sushma devi and her famous songs)

कोणतं गाणं? काय आहे किस्सा?

माझ्या भीमाच्या नावानं, कुंकू लाविलं रमानं…

सुषमादेवींचं हे गाणं आजही लोकप्रिय आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी हे गाणं बाजारात आलं. परंतु या गाण्याचा गोडवा अजूनही कमी झालेला नाही. 1985 मध्ये त्यांची ‘रमाईचं कुंकू’ ही कॅसेट बाजारात आली होती. त्याच वर्षी आनंद शिंदे यांची ‘नवीन पोपट’ ही कॅसेट बाजारात आली होती. विशेष म्हणजे या दोन्ही कॅसेटचं रेकॉर्डिंग एकाच दिवशी झालं होतं. सुषमादेवींचं हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. ते इतकं की अन्यायाचा प्रतिकार या सिनेमात हे गाणं घेण्यात आलं. सुषमादेवींचं हे गाणं गाजलं. मात्र, या कॅसेटचा म्हणावा तसा बिजनेस झाला नाही. नागपूरच्या कश्मिरा कॅसेट कंपनीने ही कॅसेट काढली होती. पण अवघ्या 18 दिवसातच या कॅसेट कंपनीच्या मालकाचा खून झाला. त्यामुळे ही कंपनी बंद पडली. परिणामी या कॅसेटच्या अधिक आवृत्या बाजारात आल्या नाही. त्यामुळे कॅसेटशी संबंधित सर्वांनाच व्यावसायिकदृष्ट्या नुकसान झालं.

फोनवरून गाणी ऐकणारा शागीर्द

सिकंदर शाद आणि सुषामादेवी यांच्या गाण्याचा सामना म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असायची. मानवेल गायकवाडांनी लिहिलेलं ‘जो तू बोलू लागला छक्का छक्का’ हे क्रिकेटवर बेतलेलं गीत तर त्या काळी खूप गाजलं होतं. अगदी गोविंद म्हशीलकर आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सुद्धा या गाण्याने वेड लावलं होतं. सुषमादेवींचे महाराष्ट्र भर शागीर्द पसरलेले आहेत. नागपूरचे उद्योगपती सिद्धार्थ घरडे हे त्यापैकी एक. ते सुषमादेवींच्या गाण्याचा एकही कार्यक्रम सोडत नसत. इतकेच नव्हे तर सुषमादेवींचं गाणं ऐकण्याची लहर आली की ते त्यांना मुंबईला फोन करत आणि फोनवरून गाणं ऐकत. इतकेच नाही तर गाणं आवडलं तर ते त्याच दिवशी सुषमादेवींना नागपूरला बोलावून घेत आणि त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करत.

विमान प्रवासही सुरू झाला

कार्यक्रमानिमित्त नागपूरला विमानाने जाता आले हा आयुष्यातील मोठा प्रसंग असल्याचं त्या सांगतात. याच नागपूरला जाण्यासाठी सुरुवातीच्या काळात बहिणीचे दागिने मोडावे लागले होते. गाण्यामुळे परिस्थिती इतकी बदलली की विमानाने प्रवास करायची संधी मिळाली, असं त्या सांगतात.

अल्ताफ राजांबरोबरही सामना

सुषमादेवी यांनी अनेक दिग्गजांबरोबर गाणी गायली आहेत. प्रकाश पाटणकर, अब्दूल रफ चाऊस, अल्ताफ राजा, सरवर जानी आणि प्रल्हाद शिंदेंसह त्यांनी अनेक बड्या गायकांसोबत कार्यक्रम केले आहेत. मात्र, अजीज नाजा यांच्यासोबत कव्वालीचा सामना करण्याचा योग आला नसल्याचं त्या सांगतात.

गाजलेली गाणी

बस तुम्हारे करीब आने से, दुश्मनी हो गयी जमाने से…

आणि

गलियों से मेरी तुमने, गुजरकर नही देखा, गम ये है की, खुशियोंने मेरा घर नही देखा…

आणि

धनी माझा मौल्यवान, पिवळा सोन्याहून, कशाला हवं गं मजला, सोन्याचं दागिनं…

आणि

दुनिया में किया जिसने, हमको मालामाल, ये तो रामजीका है लाला…

आणि

संदेसा ना चिठ्ठी भेजी, गई दो साल में, आवा सजनवा, कोनो बिहाल में…

आणि

उठल्या कळा मनी जणू, माझ्या मनातल्या, सांगू कशा मी वेदना, माझ्या मनातल्या…

आणि

काखेत लेकरू, हातात झाडणं, डोईवर शेणाची पाटी, कपडा ना लत्ता, खरकटा भत्ता, फजिती व्हायची मोठी, पण आज, आज मह्या भिमानं, भिमानं माय सोन्यानं भरली ओटी…(साभार, आंबेडकरी कलावंत) (know about sushma devi and her famous songs)

संबंधित बातम्या:

‘कांटा चुभा मेरे पांव में’ गाजलं, ‘काँटेवाली सुषमादेवी’ म्हणून ओळख मिळाली; सुषमादेवी काय सांगतात वाचाच!

लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर

पत्ता बदलला, गाणं सोडून दिलं, आवाज बसला, अनेक अफवा उठूनही ‘ही’ गायिका डगमगली नाही; वाचा सविस्तर

(know about sushma devi and her famous songs)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.