‘हे एक बाईच कसं बोलू शकते”,  ‘पदर नीट घेतला असतास तर…’ म्हणणाऱ्या चाहतीला हेमांगी कवीने सुनावले खडे बोल!

प्रख्यात अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावरुन अनेक बोल्ड मानल्या जाणाऱ्या विषयांवर दिलखुलास मतं व्यक्त करत असताना दिसत असते. दरम्यान, हेमांगी कवी ही एक मराठमोळी तसेच एक कसदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

‘हे एक बाईच कसं बोलू शकते”,  ‘पदर नीट घेतला असतास तर...’ म्हणणाऱ्या चाहतीला हेमांगी कवीने सुनावले खडे बोल!
Hemangi Kavi
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 1:55 PM

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावरुन अनेक बोल्ड मानल्या जाणाऱ्या विषयांवर दिलखुलास मतं व्यक्त करत असताना दिसत असते. दरम्यान, हेमांगी कवी ही एक मराठमोळी तसेच एक कसदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लोखांनी चाहते आहेत. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती सोशल मीडियावर नेहमीच संवाद साधते. नुकतेच तिने साडी परिधान करून सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, या फोटोतही काही चाहत्यांना उणीवा दिसल्याच…

हेमांगीच्या साडीतील या सुंदर फोटोंवर देखील एका चाहतीने कमेंट करत उणीवा काढल्या. मग, शांत राहील ती हेमांगी कशी? हेमांगी कवीनेही या चाहतीला चांगलेच बोल लगावले आहेत.

पाहा हेमांगीची पोस्ट :

‘विजयादशमी मैत्रिणींनो, ही सुंदर cotton साडी मला @aarsahandloom ने दसऱ्यानिमित्त भेट पाठवली. ही साडी पाचवारीच आहे. मी ती नववारी सारखी नेसलेय. Youtube वर पाचवारीची नववारी कशी नेसावी याचे ढीगभर videos तुम्हांला बघायला मिळतील. खूप सोप्पी आहे. रेशमी खण blouse आहे. जो मी माझ्या college मध्ये असताना शिवला होता… माझ्या गावावरून (म्हसवड) हे कापड आणलं होतं. आता असे रेशमी खण क्वचितच मिळतात. वीस एक वर्ष झाली असतील या blouse ला! वीस वर्षांपूर्वीचा blouse आपल्याला अजूनही व्यवस्थित बसतो याचा एक वेगळाच आनंद असतो. हो की नाही? काही गोष्टी जपून ठेवायला मला खूप आवडतं, त्यातलीच ही एक गोष्ट!’, असे कॅप्शन देऊन तिएन ही पोस्ट शेअर केली होती.

काय म्हणाली चाहती?

हेमांगीचे हे फोटो पाहून एका चाहतीने कमेंट करत म्हंटले की, ‘खूप सुंदर दिसतेस. साधेपणातलं तुझं सौंदर्य छानच. तुझे विचार ही खूप छान आहेत. थोडंसं खटकलं- मराठमोळ्या पेहरावावर पदर ही नीट घेतला असतास तर अजुन छान दिसलं असतं.’

हेमांगीचं सडेतोड उत्तर

यावर हेमांगी कवीनेही या कमेंटला उत्तर देत तिला चांगलेच खडे बोल सुनावले. उत्तर देताना हेमांगी म्हणते, ‘पदर नीट घेतला असता म्हणजे? हे एक बाईच कसं बोलू शकते? याचं नवल वाटतं मला! ते ही तुमच्या सारख्या sleeveless घातलेल्या बाई कडून यावं? मराठमोळ्या संस्कृतीत साडी वर sleeveless blouse कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढंच दूर होईल!’

‘आपण बायकाच जिकडे लक्ष जाणार नाही किंवा लोकांच्या लक्षात ही येणार नाही अश्या गोष्टी का अधोरेखित करतो? आणि समजा लक्ष गेलंच तर तो त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो. आपण किती ही झाकून ठेवलं तरी ज्याला जे बघायचंय आणि विचार करायचाय तो करतोच!’ असं म्हणत हेमांगीने चाह्तीअला उत्तर दिलं आहे.

हेही वाचा :

Morning Workout | समंथा बॅक टू रुटीन! सोशल मीडियावर शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, फिटनेस पाहून चाहतेही अवाक्!

Birthday Celebration | पती आणि मुलांसोबत हेमा मालिनी यांनी साजरा केला वाढदिवस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो!

परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.