अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार, ‘सिंगल’मधून हास्याचा धमाका करणार

प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे 'सिंगल' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी असल्याचे समोर आले असून चित्रपटाची कथा ही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारीत आहे.

अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार, 'सिंगल'मधून हास्याचा धमाका करणार
सिंगल चित्रपटाची टीम
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 4:15 PM

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेता अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि प्रथमेश परब (Prathamesh Parab) ही जोडी पहिल्यांदाच एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आजवर प्रथमेशच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले तर अभिनयच्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. एकत्र कधीही काम न केलेली ही तरुण कलाकारांची जोडगोळी दमदार आणि उत्कंटावर्धक चित्रपटातून लवकरच समोर येणार आहे. ‘सिंगल’ (Single Movie) असं चित्रपटाचं नाव असून प्रथमेश आणि अभिनय या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटाचं स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे येथे गणपती मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण करून करण्यात आलं. यावेळी अभिनेता अभिनय बेर्डे, प्रथमेश परब, दिग्दर्शक चेतन चवडा, निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम तसेच संतोष शर्मा, शीतल ढेकळे, रितेश ठक्कर, सुहास गायकवाड हे उपस्थित होते.

प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे ‘सिंगल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी असल्याचे समोर आले असून चित्रपटाची कथा ही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारित आहे. आताची तरुण पिढी आणि त्यांचे विश्व याची धमाल मस्ती या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे या तरुण जोडगोळीचा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास लवकरच सज्ज होत आहे.

दिग्दर्शक चेतन चवडा दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम निर्मित असून हास्यकल्लोळ सादर करण्यास ते सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन सोहळ्याला हा चित्रपट लवकरच चित्रीकरणास जाणार असल्याचे समोर आले आहे. प्रथमेश आणि अभिनयच्या व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी कोणते कलाकार कल्ला करणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

नुकत्याच ‘सिंगल’ या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन सोहळा पार पडला असून चित्रपटाबाबतची उत्सुकता सिनेरसिकांना लागून राहिली आहे. हा चित्रपट आणि चित्रपटातील कलाकार कितपत हास्याच्या जोरावर प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Shaktimaan : शक्ति.. शक्ति… शक्तिमान मोठ्या पडद्यावर अवतरणार, फॅन्सचा आनंद गगनात मावेना, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

IPL 2022 Auction Day 1 Live Updates: मेगा ऑक्शनमध्ये दिसला शाहरूखचा मुलगा, चाहता म्हणाला, ‘शेर का बच्चा आ गया’

बदलली, बदलली, अरुंधती अख्खी बदलली, आशुतोष केळकर डोळे मोठे करुन पाहातच राहिला? तुम्ही पाहिलंत?

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.