‘अन्य’ सिनेमा प्रथमेश परब वास्तववादी भूमिकेत,10 जूनपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

दक्षिणात्य दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी 'अन्य'चं दिग्दर्शन केलं असून, लेखनही त्यांचंच आहे. संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी सज्जन कालाथील यांची आहे. या चित्रपटात प्रथमेशच्या साथीला रायमा सेन, अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे, यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव आदी कलाकार दिसणार आहेत.

'अन्य' सिनेमा प्रथमेश परब वास्तववादी भूमिकेत,10 जूनपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 7:36 PM

मुंबई : काही कलाकार चित्रपटातील आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत किंवा रिस्क घ्यायला मागे पुढे पहात नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका प्रथमेश परबही (Prathmesh Parab) याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो. आपल्या वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करायचं आणि त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायची हा प्रथमेशला आजवर मिळालेल्या यशाचा मंत्र आहे. 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘अन्य’ (Anya Movie) या हिंदी-मराठी चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठीही प्रथमेशनं अत्यंत कठोर मेहनत घेतली आहे.

निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं ‘अन्य’ची निर्मिती केली आहे. प्रथमेशनं साकारलेला दगडू जसा महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाला तसंच ‘अन्य’मधीलही त्याचं कॅरेक्टर लोकप्रिय होणार आहे. केवळ त्यात प्रथमेश रोमँटिक मूडमध्ये होता, पण आता त्याचा रावडी लुक पहायला मिळणार आहे. वास्तववादी घटनांवर आधारलेल्या ‘अन्य’मध्ये समाज विघातक रॅकेटचा पर्दाफाश करण्याची कामगिरी हाती घेण्यात येते. यासाठी हेरगिरी करण्याची जबाबदारी प्रथमेशकडे सोपवण्यात येते. चित्रपटात हे कॅरेक्टर रिअल वाटावं यासाठी प्रथमेशनं चक्क दिल्लीतील रेड लाईट एरियात जाऊन पाहणी केली होती. कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत अगदी सहजपणे पोहोचते असं प्रथमेश मानतो. याच कारणासाठी आपण ज्या प्रकारची व्यक्तिरेखा साकारतो त्याचं राहणीमान, त्याचा स्वभाव, त्याची बोलीभाषा आत्मसात करण्यासाठी प्रथमेश नेहमीच सज्ज असतो. ‘अन्य’मधील कॅरेक्टरही लोकांपर्यंत अगदी सहजपणे पोहाचवता यावं यासाठीच रेड लाईट एरियाला भेट दिल्याचं प्रथमेशचं म्हणणं आहे. यात प्रथमेशची भूमिका अत्यंत वास्तववादी असून, कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे.

हे सुद्धा वाचा

दक्षिणात्य दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी ‘अन्य’चं दिग्दर्शन केलं असून, लेखनही त्यांचंच आहे. संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी सज्जन कालाथील यांची आहे. या चित्रपटात प्रथमेशच्या साथीला रायमा सेन, अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे, यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव आदी कलाकार दिसणार आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.