‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी गायत्री दातारचं म्युझिकल गिफ्ट, ‘नको हा बहाणा’म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार

झी म्युझिक मराठी यांचा नवा मराठी म्युझिक अल्बम ‘नको हा बहाणा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये अभिनेता निखिल चौधरी आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची गोड जोडी प्रेक्षकांना बघायला मिळेल. या गाण्याचं पोस्टर रिलीज झालंय.

'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी गायत्री दातारचं म्युझिकल गिफ्ट, ‘नको हा बहाणा’म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार
गायत्री दातार, निखिल चौधरी,
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 12:44 PM

आयेशा सय्यद, मुंबई : फेब्रुवारी महिना हा अनेक युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देणं, डेटवर जाणं, समुद्रकिनारी बसून गप्पा मारणं अशा अनेक माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करतात. या महिन्याचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे व्हॅलेंटाईन डे. येणारा १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे चे अजून एक  खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे याच दिवशी झी म्युझिक मराठी घेऊन येत आहे एक नवीन मराठी म्युझिक अल्बम ‘नको हा बहाणा’ या गाण्यामध्ये अभिनेता निखिल चौधरी (Nikhil Chaudhari) आणि अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) यांची गोड जोडी प्रेक्षकांना बघायला मिळेल. या गाण्याचं पोस्टर रिलीज झालं असून सोशल मिडीयावर या गाण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे.

‘नको हा बहाणा’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

म्युझिक मराठी यांचा नवा मराठी म्युझिक अल्बम ‘नको हा बहाणा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये अभिनेता निखिल चौधरी आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची गोड जोडी प्रेक्षकांना बघायला मिळेल. या गाण्याचं पोस्टर रिलीज झालंय.

निमिषा चौधरी प्रस्तुत ‘नको हा बहाणा’हे गाणं सौरभ चौघुले यांनी दिग्दर्शित केलं आहे. हे गाणं देव अहिरराव यांनी गायलंय. त्यांनीच या गाण्याला संगित दिलं आहे. तर गीतकार संकेत जाधव यांनी हे गाणं लिहीलं आहे.

गायत्री दातारने ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून इंडस्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ती बिग बॉस मराठीमध्ये देखील दिसली. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या या नव्या गाण्याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

कर्नाटक हिजाब प्रकरणात कंगना रनौतची उडी, म्हणाली, हिंमत असेल तर अफगानिस्तानात…

VIDEO | अलविदा करण्याआधी शेवटचं शूट, सिद्धूसोबत डान्स, रमेश देव यांचे अखेरचे क्षण

Gehraiyaan Movie : दीपिका पादुकोणचं ओटीटी डेब्यू, ‘गेहराईयाँ’ रिलीज होताच प्रेक्षकांचा भरूभरून प्रतिसाद

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.