Prajakta Mali: ‘प्रणयी संकेत नवा..’ म्हणणाऱ्या प्राजक्ता माळीला वैशाख वणव्यात कसा काय जाणवतोय ऋतू हिरवा?
फक्त शांता शेळकेंचीच नाही तर आरती प्रभूंचीही कविता आणि सुप्रसिद्ध गाणं प्राजक्ता माळीला फोटो शेअर करताना आठवलीय.
मुंबई : सध्या वातावरण खूप तापलंय. गरमही (Heat Wave) फार होतंय. पारा वाढतच चाललाय. त्यात भर पडतेय, ती प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) फोटोंची. नुकताच ब्लाऊजलेस साडीसोबत फोटो प्राजक्तानं फोटो (Prajakta Mali Photos) शेअर केला होता. या फोटोची तुफान चर्चा तर झालीत. या नंतर आता प्राजक्ता माळीच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांचं बारीक लक्ष असणारच. नुकताच प्राजक्ता माळीनं आणखी एक साडीतला फोटो शेअर केलाय. ज्येष्ठ कवियीत्री शांता शेळके यांच्या प्रसिद्ध कवितेच्या ओळींची कॅप्शन देत प्राजक्ता माळीनं शेअर केलेले फोटो चाबत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एकाच दिवसात या फोटोवर हजारो जणांनी लाईक्स आणि कमेट्सचा पाऊस पाडलाय. या फोटोत प्राजक्ता माळीनं ऋतू हिरवा, ऋतू बरवा म्हणत, खास समर कलेक्शन साडीसोबत इन्स्टाग्रावर फोटो शेअर केले आहेत.
पाहा फोटो…
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
ऐन वैशाख वणव्यात प्राजक्ता माळीला ऋतू हिरवा कसा जाणवतोय, हा प्रश्नही चाहत्यांना पडणं स्वाभाविक आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी वेगवेगळ्या साडी कलेक्शनचं प्रमोशन करताना दिसतेय. तिच्या या खास फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये रंगतेय.
View this post on Instagram
फक्त शांता शेळकेंचीच नाही तर आरती प्रभूंचीही कविता आणि सुप्रसिद्ध गाणं प्राजक्ता माळीला फोटो शेअर करताना आठवलीय. निवडूंग चित्रपटातील लव लव करी पातं गाण्याचे बोल शेअर करत आणखीही काही फोटो प्राजक्ता माळीनं शेअर केले आहेत. टरकॉईश ब्लू ब्लाऊज आणि पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या साडीत प्राजक्ता अधिक खुलून दिसली आहे.
View this post on Instagram
कानात सफेद फूल गुंफलेल्या प्राजक्ता माळीनं आपल्या स्पेशल पोजमध्ये काढलेले फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहेत. ब्लाऊजलेस साडीनंतर तिनं शेअर केलेलं हे दुसरं फोटोशूट आहे.
View this post on Instagram
तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ऋतूजा बागवेनंही प्राजक्ताच्या फोटोवर कमेंट कर हास्यविनोद केलाय. ऋतू बरवा या पोस्टवर निशाणा साधत ‘ऋतू बागवा’ अशी कमेट ऋतूजा बागवेनं केली आहे. तिच्या कमेंटवर अनेकांनी खळबळून स्माईली दिल्यात.
प्राजक्ताचा फुल्ल फोटो :
View this post on Instagram
एका साडीच्या ब्रॅन्ड कलेक्शनसाठी सध्या प्राजक्तानं हे फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून साडी कलेक्शनचंही कौतुक होतंय.