प्राजक्ता माळी हिचा संन्यास?, श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली, म्हणाली, मी अजून…

प्राजक्ता माळी बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात अवघे दोन ते तीन दिवस राहिली. यावेळी तिने आश्रमातील सत्संगासह विविध कार्यक्रमात भाग घेतला. आश्रमात तिने ध्यानधारणाही केली.

प्राजक्ता माळी हिचा संन्यास?, श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली, म्हणाली, मी अजून...
prajakta maliImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 7:57 AM

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे, कधी तिच्या रोखठोक भूमिकांमुळे तर कधी तिच्या पोस्टमुळे. सध्याही ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने आपण संन्यास घेत नसल्याचं म्हटलं आहे. प्राजक्ताला असं का म्हणावसं वाटलं असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. विशेष म्हणजे बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात जाण्यापूर्वीच तिने ही पोस्ट केल्याने तिची चर्चा तर होणारच.

पाच दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली होती. तिथे ती सत्संगात रमली होती. त्यापूर्वी तिने एक पोस्ट केली. नाही नाही संन्यास नाही घेतलाय…हिमालयात नाही चालले, आश्रमात फार नाही राहिले.. मायानगरी मुंबईत परत आले, अशी पोस्ट तिने केली आहे.

हे सुद्धा वाचा

ध्यानधारणा, प्रवचनाचा अस्वाद

प्राजक्ता माळी बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात अवघे दोन ते तीन दिवस राहिली. यावेळी तिने आश्रमातील सत्संगासह विविध कार्यक्रमात भाग घेतला. आश्रमात तिने ध्यानधारणाही केली. श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनाचा आस्वादही घेतला. यावेळी तिने श्री श्री रविशंकर यांना एक प्रश्नही विचारला. लग्न करणं आवश्यक आहे का? असा तिचा सवाल होता.

तिच्या या प्रश्नावर श्री श्री रविशंकर मिश्किल हसले होते. यावेळी त्यांनी लग्न करणं न करणं हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला ज्या गोष्टीत आनंद वाटतो ती गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे, असं श्री श्री रविशंकर यांनी तिला सांगितलं. प्राजक्ताने प्रश्न विचारल्यानंतर श्री श्री रविशंकर यांनी आधी मिश्किल उत्तर दिलं. त्यामुळे एकच हशा पिकला. नंतर श्री श्री यांनी अत्यंत मार्मिकपणे या प्रश्नाचं निरुपण केलं.

आश्रमातील व्हिडीओ

प्राजक्ताने यावेळी आश्रमातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आश्रातील दृश्य, मेडिटेशन, प्रवचन आणि श्री श्री रविशंकर यांच्याशी झालेली भेट आदी दृश्य या व्हिडिओत दिसत आहेत. तसेच या प्रवचनाला हजारो लोक आल्याचंही दिसत आहे. आपल्याला गुरुचा आशीर्वाद मिळाल्याचं प्राजक्ताने यावेळी म्हटलंय.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.