‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड, वाचा सविस्तर…

तब्बल 250 हून अधिक कलाकारांचा समावेश असलेला 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या चित्रपटाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.

'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'ची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड, वाचा सविस्तर...
'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 5:01 PM

मुंबई : तब्बल 250 हून अधिक कलाकारांचा समावेश असलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी(Institute of Pavtology) या चित्रपटाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Pune International Film Festival) निवड झाली आहे. दिग्दर्शक प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi) आणि सागर वंजारी (Sagar Vanjari) यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाही येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची निर्मिती फटमार फिल्म्स एलएलपीच्या नेहा वंजारी , प्रसाद नामजोशी, यांनी केली आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. या चित्रपटात तब्बल 250 हून अधिक कलाकारांचा समावेश आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची निर्मिती फटमार फिल्म्स एलएलपीच्या नेहा वंजारी , प्रसाद नामजोशी, यांनी केली आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी या दोन्ही दिग्दर्शकांचे या पूर्वीचे चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवले गेले असल्यानं इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्यासह दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन, गिरीश जांभळीकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.

“गेली दोन वर्षं इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाचं काम सुरू होतं. आता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारे पहिल्यांदाच दोन वर्षांची मेहनत पडद्यावर येणार असल्याचा आनंद आहे. अतिशय वेगळा आशयविषय असलेला हा चित्रपट हाताळणे काहीसे अवघड होते. मात्र ही कामगिरी आता पार पडली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानंतर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा मानस आहे”, असं दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

सोलापुरात नागराजच्या ‘झुंड’ची जादू; 15-16 वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवलं!

“लय सुसाट, ताणूताणू मागं लागलीय ईडी”, नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा, राष्ट्रवादीचं खास नवं गाणं, ऐकाच….!

Jhund: “तुला अशा रुपात पहायचं नव्हतं..”; आकाश ठोसरच्या भूमिकेवर पहा आमिर काय म्हणतोय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.