AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठीतही मनोरंजनाची मेजवानी, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिबट्या’

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 'बिबट्या' या चित्रपटाचे पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

मराठीतही मनोरंजनाची मेजवानी, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बिबट्या'
| Updated on: Apr 14, 2021 | 3:23 PM
Share

मुंबई :  गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘बिबट्या’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती स्वयंभू प्रॅाडक्शनची असून या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकाशाने झगमगलेले शहर दिसत आहे व लांब कुठल्यातरी डोंगरावरून एका काळ्या आकृतीतील बिबट्या त्या शहराकडे बघताना दिसत आहे. (Marathi upcoming film bibtya will release soon)

या चित्रपटात विजय पाटकर, महेश कोकाटे, अनंत जोग, प्रमोद पवार, डॉ विलास उजवणे, अशोक कुलकर्णी, ज्ञानदा कदम, मनश्री पाठक, सचिन गवळी, सोमनाथ तडवळकर, सुभोद पवार, चैत्राली डोंगरे, सुशांत मांडले आदी कलाकार आहेत. हे पोस्टर पाहून लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चित्रपटाची कथा चंद्रशेखर सांडवे यांची आहे तर पटकथा चंद्रशेखर सांडवे व आर. मौजे यांची असून या चित्रपटाचे संवाद कमलेश खंडाळे यांनी लिहले आहेत.

बिबट्याने आज येथे हल्ला केला ,शहरात आज बिबट्या या ठिकाणी आढळला या व अश्या अनेक बातम्या आपण वारंवार ऐकतो. हा चित्रपट नक्की याच धाटणीवर आहे की कोणता नवीन विषय घेऊन तो लोकांसमोर येणार आहे हे लवकरच समजेल. शहरातील लोकांना बिबट्या हा एक हिंस्र प्राणी असून तो केवळ शहरात त्रास देण्यासाठीच येत असतो या पलीकडे काहीच माहिती नाही.  तो आपल्या शहरात येत नसून आपण त्याच्या जंगलात शिरलो आहोत, हे ते पूर्णपणे विसरले आहेत.हाच विषय घेऊन हा सिनेमा येत आहे कि कोणता नवीन विषय मांडणार आहे.

संबंधित बातम्या : 

‘चंद्र आहे साक्षीला’नंतर सुबोध भावे पुन्हा सिनेमाकडे, बालगंधर्वांचे नाटक रुपेरी पडद्यावर

Marathi Movie : ‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर आता भाऊसाहेब शिंदेकडून नव्या चित्रपटाची घोषणा, झळकणार नव्या भूमिकेत

Puglya : मराठी सिनेमाचा ‘मॉस्को’त डंका, ‘पगल्या’ला सर्वोत्तम पुरस्कार

(Marathi upcoming film bibtya will release soon)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.