Marathi Movie | सुयश टिळक-मिताली मयेकरची ‘हॅशटॅग प्रेम’कथा, नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

'हॅशटॅग प्रेम' हा आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट याचीच अनुभूती देणारा आहे. कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे लांबणीवर गेलेला 'हॅशटॅग प्रेम' 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.

Marathi Movie | सुयश टिळक-मिताली मयेकरची ‘हॅशटॅग प्रेम’कथा, नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 2:20 PM

मुंबई : प्रेमाचा मूळ रंग गुलाबी असला तरी त्याच्या अनेक छटा आजवर प्रत्येकानं आपापल्या परीनं अनुभवल्या आहेत. काळानुरूप प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी मूळ प्रेमभावना आजही तिच आहे. आजचा आधुनिक काळही यात बदल घडवू शकलेला नाही. तरुणाईला जी भाषा समजते आणि जी लँग्वेज इझी वाटते, त्या भाषेत आज प्रेम व्यक्त केलं जात आहे. याच कारणामुळं प्रेमकथांवर आधारित चित्रपटांची टायटल्सही त्याच रंगात रंगल्याची पहायला मिळतात.

‘हॅशटॅग प्रेम’ हा आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट याचीच अनुभूती देणारा आहे. कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे लांबणीवर गेलेला ‘हॅशटॅग प्रेम’ 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.

लॉकडाऊनमुळे लागला ब्रेक

खरं तर हा चित्रपट अगोदर 19 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, पण लॅाकडाऊन लागलं आणि सगळीच गणितं बदलली. आता पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून आकाशाकडे झेपावत ‘हॅशटॅग प्रेम’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर अगोदरच प्रदर्शित झाला असून, ट्रेलरला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. राजेश बाळकृष्ण जाधव यांनी मोठ्या कुशलतेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री या चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र असून, रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी पुरेशी ठरणार आहे.

‘हॅशटॅग प्रेम’च्या ट्रेलरमध्ये मिताली-सुयश या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली आहे. आता चित्रपटात ही जोडी कशा प्रकारे धमाल करते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीही आतुरली आहे.

नातेसंबंधांवर भाष्य करणार ‘हॅशटॅग प्रेम’

दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा ‘हॅशटॅग प्रेम’ची टीम नव्या जोमानं प्रदर्शनाच्या तयारीला लागली आहे. प्रेम हा तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आवडता विषय आहे. प्रेमाला असंख्य पैलू आणि बाजू आहेत. त्यातील काही अप्रकाशित पैलू आणि त्यानिमित्तानं येणाऱ्या नातेसंबंधांवर ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या कथेत प्रेक्षकांसाठी एक अंडरकरंट मेसेजही दडला आहे. सुमधूर गीत-संगीताचा साज लेऊन सजलेलं या चित्रपटाचं आजच्या युगातील कथानक प्रेक्षकांना नक्कीच आपलंसं वाटेल यात शंका नसल्याचं मतही जधव यांनी व्यक्त केलं आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि प्रभावी कथानक हे या चित्रपटाचे सर्वात मोठे प्लस पॅाइंट असून, चित्रपट पाहताना प्रेक्षकांना याचा अनुभव येईल असं निर्माते अनिल गोविंद पाटील यांचं म्हणणं आहे.

या सिनेमाची कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली आहे. डीओपी राजा फडतरे यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी रसिकांना भुरळ पाडणारी आहे. गीतकार संजाली रोडे आणि कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार प्रविण कुवर यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी गायक-संगीतकार रोहित राऊतनं सांभाळली आहे. कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केलं असून, महेश भारंबे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘हॅशटॅग प्रेम’ची निर्मिती केली असून, वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या सहयोगानं पिकल एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून हा चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. अरविंद गोविंद पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

हेही वाचा :

चिमुकली अवनी करणार ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं सूत्रसंचालन, वडील देखील सुप्रसिद्ध गायक!

Jai Bhawani Jai Shivaji : शिवबांचा जिगरबाज मावळा ‘शिवा काशिद’, चतुरस्त्र भूमिकेत दिसणार अभिनेता स्तवन शिंदे!

Video: साडेचार कोटीच्या ‘लॅम्बॉर्गिनी’च्या बोनटवर ठेऊन कार्तिक आर्यनकडून स्ट्रीट फूडचा आस्वाद, कार्तिकच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.