AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाबू’मध्ये नेहा महाजनची एंट्री, लॉकडाऊननंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार मराठीत ॲक्शनचा तडका!

अभिनेता अंकित मोहनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'बाबू' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या एकदम जोमात सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अंकितचे ॲक्शनचा सीन्स व्हायरल झाले होते. ॲक्शनचा धमाका असणाऱ्या या चित्रपटात आता नेहा महाजनची एंट्री झाली आहे.

'बाबू'मध्ये नेहा महाजनची एंट्री, लॉकडाऊननंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार मराठीत ॲक्शनचा तडका!
Neha Mahajan
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 2:07 PM
Share

मुंबई : अभिनेता अंकित मोहनची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बाबू’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या एकदम जोमात सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अंकितचे ॲक्शनचा सीन्स व्हायरल झाले होते. ॲक्शनचा धमाका असणाऱ्या या चित्रपटात आता नेहा महाजनची एंट्री झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

त्यामुळे नेहाचा हा एकंदर पेहराव बघून या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. आता नेहाची भूमिका काय आहे, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे असून निर्माता बाबू के. भोईर हे आहेत. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन यांच्यासोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे.

अंकित मोहन दिसणार हटके भूमिकेत

काही दिवसांपूर्वी ‘बाबू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. त्याचे चित्रीकरण आता बऱ्यापैकी पूर्ण होत आले असून नुकताच या चित्रपटाचा ॲक्शन सिक्वेन्स चित्रित करण्यात आला. यात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स असून त्यासाठी अंकितने बरीच मेहनत घेतल्याचे दिसत आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. या वेळी अंकितसोबत अभिनेत्री रूचिरा जाधवही उपस्थित होती. ‘बाबू’मध्ये अंकित, रूचिरासोबत नेहा महाजनही दिसणार आहे.

भूमिकेबद्दल सांगताना अंकित म्हणतो…

‘बाबू’च्या भूमिकेविषयी अंकित मोहन म्हणतो, ‘’बाबू ही व्यक्तिरेखा अंकितच्या खूप जवळची आहे. आमच्यात खूप साम्य आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. परंतु यातील ॲक्शन सीन्ससाठी मी मेहनत घेतली आहे. मी मार्शल आर्ट, कलरीपयट्टू शिकलो असल्याने मला त्याचा इथे खूप फायदा झाला. याआधीही मी ॲक्शन सीन्स केले आहेत. मात्र ऐतिहासिक आणि अशा प्रकारच्या ॲक्शन सीन्समध्ये खूप फरक आहे. ऐतिहासिक ॲक्शन सीन्स करताना तुमच्या हातात हत्यार असते तर अशा प्रकारच्या ॲक्शन सीन्समध्ये हातच तुमचे हत्यार असते. परंतु या दोन्ही सीन्समध्ये नियंत्रण आणि काळजी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे दोन्ही अनुभव मी घेतले आहेत. ‘बाबू’मधील ॲक्शन सीन्स मी खूप एन्जॅाय केले.’’

श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटाचे निर्माता बाबू के. भोईर असून दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे आहेत. ॲक्शन सीन्सचा भरपूर तडका असलेला ‘बाबू’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा :

Dating Advice | डेटिंगबद्दल सारा अली खानला आई अमृताने दिला होता सल्ला, म्हणाली ‘रिलेशनशिपमध्ये आल्यावर…’

‘माझे पती बॉलिवूडला टार्गेट करत नाहीयत’, समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ पुढे आली पत्नी क्रांती रेडकर!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.