Pandit Bhimsen joshi Award 2022 जाहीर, भरत कामत आणि सुधीर नायक यांच्या कार्याचा गौरव, 27 मार्चला रंगणार स्वरमैफल

Pandit Bhimsen joshi Award : जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं 27 मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना यंदाचा पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार 2022 प्रदान करण्यात येणार आहे.

Pandit Bhimsen joshi Award 2022 जाहीर, भरत कामत आणि सुधीर नायक यांच्या कार्याचा गौरव, 27 मार्चला रंगणार स्वरमैफल
पं. भीमसेन जोशीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 12:21 PM

मुंबई : जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं 27 मार्चला पं. भीमसेन जोशी (Pandit Bhimsen joshi) स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत (Bharat Kamat) आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक (Sudhir Nayak) यांना यंदाचा पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार 2022 (Pandit Bhimsen joshi Award) प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचे या महोत्सवात सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश हेगडे, प्रकाश गंगाधरे, प्रवीण कानविंदे, प्रवीण शिंपी, विनोद सौदागर आणि जयप्रकाश बर्वे आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.

जीएसबी सभा, मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्ट यांच्या सहकार्याने दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. येत्या रविवारी 27 मार्चला सायंकाळी 5.30  वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश हेगडे, प्रकाश गंगाधरे, प्रवीण कानविंदे, प्रवीण शिंपी, विनोद सौदागर आणि जयप्रकाश बर्वे आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.

 पं. राम देशपांडे यांची मैफल होणार

ज्येष्ठ गायक पं. राम देशपांडे यांची संगीत मैफल होणार आहे. त्यांना सुधीर नायक हार्मोनियम साथ, भरत कामत तबला साथ, माधव पवार पखवाज साथ, रवींद्र शेणॉय मंजिरा साथ करणार आहेत. ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष श्री. बी.एस. बलिगा, उपाध्यक्ष श्री.सच्चीदानंद पडियार, सरचिटणीस श्री गणेश राव, संयोजक श्री. के व्ही एन भट, श्री.यु. पद्मनाभ पै आदी मंडळींनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याच्या प्रवेशिका महाराष्ट्र सेवा संघ हॉल, मुलुंड येथे सकाळी 10.30 ते संध्या. 7 पर्यंत उपलब्ध आहेत तरी जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या

नुसता टॅक्स फ्री कशाला? ‘द काश्मीर फाईल्स’ यूट्यूबवर टाका सगळ्यांना मोफत बघता येईल- Arvind Kejriwal

RRR Public Review | अद्भूत, जबरदस्त, थरारक… प्रेक्षकांकडून शिट्ट्यांची सलामी, ‘RRR’ पाहून पब्लिक क्या बोलती?

Chandramukhi Movie : “Amruta Khanvilkar पेक्षा मी चांगली चंद्रमुखी साकारली असती”, Mansi Naikचा दावा

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.