‘कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे’; ओळखलंत का या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला?

स्कार्फ बांधलेल्या एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा (Marathi Actress) फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'कॅच मी इफ यू कॅन' असा मजेशीर कॅप्शन देत या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे.

'कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे'; ओळखलंत का या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला हा फोटोImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:25 AM

पुणेरी पाट्या जितक्या प्रसिद्ध आहेत, तितकीच पुण्यातील स्कार्फ (Pune) संस्कृतीही प्रसिद्ध आहे. पुण्यातल्या कुठल्याही रस्त्यावरून गेलो तरी तोंडावर स्कार्फ बांधलेल्या मुली सहज पहायला मिळतात. स्कार्फ हा जणू पुण्यातील मुलींच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण भाग आहे. पुण्यातील बहुतांश मुली दुचाकीवरून किंवा बसमधून प्रवास करत असताना तोंडाला स्कार्फ बांधतात. असं दृश्य मुंबईत (Mumbai) क्वचितच पहायला मिळतं. पण सध्या असाच स्कार्फ बांधलेल्या एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा (Marathi Actress) फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘कॅच मी इफ यू कॅन’ असा मजेशीर कॅप्शन देत या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. मुंबईत रिक्षामधून प्रवास करताना तिने चेहऱ्याला स्कार्फ बांधला असून गॉगलसुद्धा लावला आहे. त्यामुळे तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे.

‘कॅच मी इफ यू कॅन..कुठेतरी मुंबईतल्या रस्त्यावर आहे. कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे,’ असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या फोटोला दिलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मुक्ता बर्वे आहे. मुक्ताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘छान’, अशी कमेंट अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केली आहे. तर एकाने मुक्ताला ‘हाडाची पुणेकर’ म्हटलं आहे. काहींनी तर मुक्ताच्या या लूकला चक्क ‘स्पायडर व्हुमन’ म्हटलंय. ‘मास्कचा खराखुरा आणि योग्य उपाय’, अशीही प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

गेल्या काही दिवसांपासून मुक्ता ही ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र सोनी मराठी वाहिनीवरील या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत मुक्ताने अभिनेता उमेश कामतसोबत भूमिका साकारली. बऱ्याच वर्षांनी ही लोकप्रिय जोडी एकत्र आली होती. ‘एका गोष्टीच्या शेवटामध्ये दुसऱ्या गोष्टीची सुरवात लपलेली असते..’ असं कॅप्शन देत मुक्ताने मालिकेच्या सेटवरचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

हेही वाचा: 

हा क्यूट फोटो आहे मराठीतील टॉप अभिनेत्रीचा, कोण आहे ओळखलं का?

विवाहित असतानाही किरणच्या प्रेमात पडले अनुपम खेर; वाचा त्यांची लव्हस्टोरी!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.