AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandramukhi Box Office Collection: पहिल्याच दिवशी ‘चंद्रमुखी’ची कमाई कोट्यवधींच्या घरात

आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी आणि बहारदार नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी सौंदर्यवती 'चंद्रा' (Chandramukhi) हिने खासदार दौलतराव देशमानेसोबतच प्रेक्षकांनाही वेड लावलंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये दमदार प्रतिसाद मिळतोय.

Chandramukhi Box Office Collection: पहिल्याच दिवशी 'चंद्रमुखी'ची कमाई कोट्यवधींच्या घरात
Chandramukhi Box Office CollectionImage Credit source: Facebook
| Updated on: May 01, 2022 | 3:33 PM
Share

आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी आणि बहारदार नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी सौंदर्यवती ‘चंद्रा’ हिने खासदार दौलतराव देशमानेसोबतच प्रेक्षकांनाही वेड लावलंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचे शोज हाऊसफुल जात असून आता पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच ‘चंद्रमुखी’ची (Chandramukhi) कमाई कोट्यवधींच्या घरात झाली आहे. चित्रपटात चंद्राची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. एक ध्येयधुरंदर विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच ‘चंद्रा’च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे प्रेक्षकांना या चित्रपटात पहायला मिळत आहे.

‘चंद्रमुखी’ने पहिल्या दिवशी 1.21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.

पहा इन्स्टा पोस्ट-

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ”ज्यावेळी हा चित्रपट मी करण्याचे ठरवले तेव्हाच माझ्या डोक्यात या व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पक्के होते. त्यामुळे प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहे. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी मेहनत घेतली आहे. मात्र अमृता, मृण्मयी आदिनाथबद्दल मला आवर्जून सांगावेसे वाटते. अमृताने ही भूमिका साकारण्यासाठी वजन वाढवले आणि तेच वजन चित्रपटाकरता कायम ठेवण्यासाठीही तिने खूप मेहनत घेतली आहे. भाषेवर अभ्यास केला आहे. शिवाय अनेक काळ ती सोशल मीडियापासूनही लांब राहिली. तर आदिनाथनेही त्याची देहबोली, ध्येयधुरंदर, रुबाबदार दिसण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मृण्मयीची भूमिकाही खूप महत्वपूर्ण आहे.”

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.