राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या चित्रपटात प्रिती मल्लापूरकर

विविध जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या सौंदर्याची भुरळ पाडणारी मॉडेल आणि अभिनेत्री प्रिती मल्लापूरकर (Preeti Mallapurkar) राष्ट्रीय पुरस्कारविजेते शिवाजी लोटण-पाटील (Shivaji Lotan Patil) यांच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या चित्रपटात प्रिती मल्लापूरकर
Preeti Mallapurkar Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 6:26 PM

विविध जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या सौंदर्याची भुरळ पाडणारी मॉडेल आणि अभिनेत्री प्रिती मल्लापूरकर (Preeti Mallapurkar) राष्ट्रीय पुरस्कारविजेते शिवाजी लोटण-पाटील (Shivaji Lotan Patil) यांच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाजी लोटण-पाटील यांच्या आगामी ‘आतुर’ (Aatur) या चित्रपटातून तिच्या अभिनयाची कारकिर्द सुरु होत आहे. दिग्दर्शक शिवाजी लोटण-पाटील यांच्या अगोदरच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिल्याने या नव्या चित्रपटाबाबतही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. शिवाजी यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळाली आहे. त्यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘धग’ आणि ‘भोंगा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. त्यांच्यासारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळणं ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं प्रिती सांगते.

मूळ उद्योजिका असलेल्या प्रितीने याअगोदर ‘ईश्वरी’ या चित्रपटातही काम केलं आहे. ‘ईश्वरी’ हा चित्रपट अद्यापही प्रदर्शित झाला नाही. मात्र विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. ‘ईश्वरी’ या चित्रपटात प्रितीनेएका मूकबधिर मुलीची भूमिका साकारली आहे. संगीताची कास धरणा-या या मूकबधिर मूलीच्या भूमिकेतील प्रीतीच्या अभिनयाला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाद मिळाली. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रितीला तिच्या अभिनयासाठी विशेष पुरस्कारही मिळाला.

‘आतुर’ या चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान प्रितीची दिग्दर्शक शिवाजी-लोटण पाटील यांच्याशी ओळख झाली. प्रितीकडून सहज येणारे हावभाव पाहत आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रितीच योग्य असल्याचं शिवाजी यांनी अचूकरित्या ओळखलं. शिवाजी लोटण-पाटील हे कलाकाराकडून सहजरित्या अभिनय करवून घेण्यात तरबेज असल्याचं प्रितीनं सांगितलं. भूमिकेच्या तयारीसाठी वर्कशॉपवर त्यांचा विश्वास नाही. सहज भूमिकेत शिरण्यासाठी त्यांचं दिग्दर्शनही पुरेसं असल्याचा विश्वासही प्रितीने व्यक्त केला. ‘आतुर’ या चित्रपटात प्रिती एका गृहिणीची भूमिका साकारत आहे. आपल्याला मूल हवं म्हणून धडपडणा-या एका मध्यमवर्गीय जोडप्याची कथा ‘आतुर’ या चित्रपटात मांडण्यात आलीय. पंधरा दिवसात या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं.

हेही वाचा:

Dasvi: ‘दसवी’च्या रिव्ह्यूवर भडकली यामी गौतम; म्हणाली, “यापुढे माझ्या कामाचं..”

Mulgi Zali Ho: ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार का? वाहिनीने सांगितलं सत्य

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.