‘पावनखिंड’वर मोहन भागवतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा..”

Pawankhind या चित्रपटाच्या टीमने नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ पावनखिंड चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. मोहन भागवतांनी या चित्रपटाबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली.

'पावनखिंड'वर मोहन भागवतांची प्रतिक्रिया; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा..
Mohan Bhagwat on PawankhindImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 11:35 AM

मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी आणि मराठी रसिक गर्दी करत आहेत. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सिनेमागृहांमध्ये ‘पावनखिंड’च्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ पावनखिंड चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. मोहन भागवतांनी या चित्रपटाबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली. ‘अचानक मिळालेला छान आशीर्वाद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेण्याची संधी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीमला मिळाली, तेव्हा त्यांना वीरांगना टीझर, मुख्य ट्रेलर, युगत मांडली गाणे आणि क्लायमॅक्समधील काही भाग दाखवला. सुरुवातीला दिलेली २० मिनिटांची वेळ बघता बघता १ तासाची चर्चात्मक भेट झाली. त्यांनी लवकरच संपूर्ण चित्रपट पाहण्याची इच्छा दर्शविली आहे,’ असं कॅप्शन देत या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आले.

मोहन भागवत काय म्हणाले?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा येणाऱ्या सर्व पिढ्यांना, आपल्याला, आपल्यानंतरच्या पिढ्यांना स्वाभिमान आणि संजीवनी देणारं आहे. त्यामुळे ते सर्वांसमोर आलं पाहिजे आणि योग्य रितीने आलं पाहिजे, इतिहास म्हणून आला पाहिजे. त्याबरोबर त्याचा जो भावनात्मक आशय आहे, किंवा संस्कार आहे, तो आला पाहिजे. त्या दृष्टीने हा चित्रपट अत्यंत सरस झालाय आणि खूपच परिणामकारक आहे, असं लक्षात येतंय,” असं ते म्हणाले.

पावनखिंडची दणक्यात कमाई

‘पावनखिंड’ने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या वीकेंडला इतर मोठ्या चित्रपटांची टक्कर असतानाही ‘पावनखिंड’ने दणक्यात कमाई केली. दुसऱ्या वीकेंडमध्ये शुक्रवारी 1.02 कोटी रुपये, शनिवारी 1.55 कोटी रुपये तर रविवारी 1.97 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. पहिला आठवडा आणि दुसरा वीकेंड मिळून आतापर्यंत या चित्रपटाने 16.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’ची यशस्वी घोडदौड; वीकेंडला कमावले तब्बल इतके कोटी रुपये

संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’चा अनोखा विक्रम; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

संबंधित बातम्या: ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य; चित्रपट पाहणाऱ्यांना मिसळवर डिस्काऊंट

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.