8 दोन 75 चित्रपटाला 50 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार, समाजभान जागृत करणारा सिनेमा

गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या अनोख्या नावानेच चर्चेत असलेल्या '8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर 50 पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे.

8 दोन 75 चित्रपटाला 50 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार, समाजभान जागृत करणारा सिनेमा
8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!- सिनेमा
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 12:05 PM

आयेशा सय्यद, मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या अनोख्या नावानेच चर्चेत असलेल्या ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ (8 2 75 Fakt Iccha Shakti Havi marathi movie) या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर 50 पेक्षाही ( national and international awards) अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुण्यात नुकतंच चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाने मिळवलेल्या या भरीव कामगिरीचा कौतुक सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटात अभिनेता शुभंकर तावडे (Shubhankar Tawade), अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude), शर्वाणी पिल्लई (Sharvani Pillai), संजय मोने (Sanjay Mone), आनंद इंगळे(Anand Ingale) , विजय पटवर्धन (vijay Patvardhan),  डॉ .निखिल राजेशिर्के (Nikhil Rajeshirke) अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे 8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे .’8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटात नावापासूनच वेगळेपण आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आल्यानंतर चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण झालं होतं. आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटानं 50 हून अधिक पुरस्कार मिळवण्याची कामगिरी केली आहे. सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन, सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट निर्माता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा सर्व विभागात चित्रपटाने पुरस्कार पटकावले आहेत.

आजवर फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील फेस्टिव्हल्स मध्ये ह्या चित्रपटास पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. देश आणि परदेशातल्या कोणत्याही भाषेत आजवर अवयव दानावरती चित्रपट झालेले आपण पाहिले आहेत. पण, “8 दोन 75 फक्त इच्छाशक्ती हवी !” हा देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा, असा चित्रपटाचा विषय आहे. बहुधा ह्या विषयावर झालेला कोणत्याही भाषेतला हा पहिला सिनेमा आहे.

चित्रपटाची पटकथा शर्वाणी – सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन केले आहे.

संबधित बातम्या

“मला आत्महत्या करावीशी वाटत होती”, सलमान खानचा धक्कादायक खुलासा

ऋतिक रोशनने शेअर केला सबा आझाद आणि इमाद शाहचा फोटो, म्हणाला…

“गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन, एवढे पैसे आले कुठून?, युट्यूबर गणेश आणि योगिता शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.