Prema Kiran: ‘धूमधडाका’मध्ये ‘अंबाक्का’ साकारणाऱ्या अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, उतावळा नवरा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धूमधडाका' (Dhum Dhadaka) या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती.

Prema Kiran: 'धूमधडाका'मध्ये 'अंबाक्का' साकारणाऱ्या अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड
Prema KiranImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 9:35 AM

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. प्रेमा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर (Marathi Film Industry) शोककळा पसरली आहे. धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, उतावळा नवरा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूमधडाका’ (Dhum Dhadaka) या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच त्या निर्मितीसुद्धा होत्या. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. 2004 मध्ये त्या ‘गाव थोर पुढारी चोर’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिगंबर नाईक आणि किशोर नांदलस्कर मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘फ्रेंडशिप बँड’ आणि ‘एए बीबी केके’ या चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका साकारली होती.

प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नव्या कलाकारांना मालिकांचे पैसे तीन महिन्यांपर्यंत मिळत नाहीत. तसंच पडद्यामागील कलाकारांनाही कोणी वाली नाही. त्यांच्यासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरविल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

पहा व्हिडीओ-

झी मराठी वाहिनीवरील ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात अभिनेत्री प्रेमा किरण यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ‘दे दणादण’ या चित्रपटातील शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. “माझा दे दणादण चित्रपट तुम्हाला माहितच असेल. गोल्डन जुबली सिनेमा होता. या चित्रपटातील पोलीसवाल्या सायकलवाल्या या गाण्याच्या शूटिंगच्यावेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत शूटिंग संपवायचं अशी ताकिद दिली होती. मात्र शूटिंग सुरू झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. जरा पुढे गेल्यावर त्यांनी मला खाली पाडलं. असं करत करत शूटिंगदरम्यान मी तीन वेळा सायकलवरून पडले होते. मी तीन वेळा पडले म्हणून चित्रपट हिट झाला”, असं त्या म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.