काय आहे ‘शेर शिवराज’ची कथा? ‘पावनखिंड’च्या यशानंतर वाढली उत्सुकता

आजवर शिवचरित्र अभ्यासकांनी, इतिहासकारांनी आपापल्या परीनं शिवचरित्राचं यथार्थ वर्णन केलं आहे. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रमाचे पोवाडेही अभिमानानं गायले आहेत. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो.

काय आहे 'शेर शिवराज'ची कथा? 'पावनखिंड'च्या यशानंतर वाढली उत्सुकता
Sher Shivraj Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:21 AM

आजवर शिवचरित्र अभ्यासकांनी, इतिहासकारांनी आपापल्या परीनं शिवचरित्राचं यथार्थ वर्णन केलं आहे. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रमाचे पोवाडेही अभिमानानं गायले आहेत. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा टीझर शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. त्या काळी विजापूरच्या दरबारात ‘मै लाऊंगा शिवाजी को…! जिंदा या मुर्दा!’, अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे. ‘पावनखिंड’ (Pawankhind) चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर ‘शेर शिवराज’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला?

‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात घडणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण ‘शेर शिवराज’ मध्ये दिग्पालनं केलं आहे. याची झलक नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘शेर शिवराज’च्या पोस्टर व टीझरवर ही पहायला मिळते. प्रतापगडावर डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा, महाराजांचा रक्तानं माखलेला हात, खानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणि त्या काळापासून आजच्या युगापर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांचा मूक साक्षीदार असणाऱ्या तळपत्या सूर्याचं दर्शन पोस्टरवर घडतं आणि टीझरमधूनही तो थरार आपल्याला पहायला मिळतोय.

‘शेर शिवराज’सारख्या चित्रपटांची आजच्या पिढीला गरज

‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. याविषयी बोलताना मुंबई मुवी स्टुडियोजचे निर्माते नितीन केणी सांगतात, ‘गेली २ वर्ष चित्रपटगृहांपासून प्रेक्षक दूर राहिलाय व त्यानंतर आलेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आणि आता २२ एप्रिलला प्रदर्शित होणारा ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल, यात आम्हाला शंका वाटत नाही’. राजवारसा प्रॉडक्शनचे प्रद्योत पेंढरकर म्हणाले, “आजची पिढी डिजिटल आहे. इतिहासाच्या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ, बखरी, पुस्तके यांची नितांत आवश्यकता आहेच पण त्याची आवड निर्माण होण्यासाठी चित्रपटाइतके दुसरे प्रभावी माध्यम नाही त्यामुळे ‘शेर शिवराज’सारख्या चित्रपटांची आजच्या पिढीला गरज आहे.

हेही वाचा:

“एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर..”; The Kashmir Files वर आमिर खानची प्रतिक्रिया

Sonam Kapoor होणार आई; बेबी बंपचे फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’!

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.