Gudi Padwa 2024: लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा कसा साजरा करणार मराठी कलाकार?

मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा हा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे. तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके आणि प्रसाद जवादे-अमृता देशमुख यांनी गुढीपाडव्याचा प्लॅन सांगितला आहे.

| Updated on: Apr 09, 2024 | 9:39 AM
गुढीपाडवा साजरा करण्यासाठी प्रत्येकाने तयारी केली आहे. यात मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारसुद्धा मागे नाहीत. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'पारू', 'शिवा' या मालिकेतील कलाकारांनी त्यांचा गुढीपाडव्याचा प्लॅन काय आहे, याविषयी सांगितलं आहे.

1 / 5
'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधली तितिक्षा तावडेचा हा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. याविषयी ती म्हणाली, "गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वांत महत्वाचा दिवस आहे आणि अर्थात तो मी खूप उत्साहात साजरा करणार आहे. माझा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. त्यासाठी मी खास सुट्टी घेतली आहे. गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मी सासरी जाणार आहे. माझं सासर नाशिकचं आहे. सिद्धार्थ आणि मी तिथे जाऊ आणि सुंदरशी गुडी उभारू, गोड खाऊ, सासू सासऱ्यांसोबत वेळ घालवू."

2 / 5
'पारू' मालिकेतील आदित्य म्हणजेच प्रसाद जवादेचाही हा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, "यंदाचा गुढीपाडवा बायकोसोबत साजरा करणार आहे. सुट्टी नाही मिळाली तर व्हिडीयो कॉलवर एकत्र गुढी उभारू. पण सुट्टीसाठी खूप प्रयत्न सुरु आहेत. आम्ही हल्लीच ठाण्याला शिफ्ट झालो आहोत आणि आमच्या आवडत्या गोष्टींनी घर सजवलंय. माझी खूप इच्छा आहे की अमृताला एक छानशी साडी भेट देणार आहे. साताऱ्यातूनच ती खास साडी तिच्यासाठी घेऊन जाणार आहे. आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट हीच असणार की आम्ही एकत्र असू. त्या दिवशीचा स्वयंपाक आम्ही एकत्र मिळून बनवणार आहोत."

3 / 5
'शिवा' मालिकेतील आशु म्हणजेच शाल्व किंजवडेकरने  सांगितलं की, "मी, शिवा आणि झी मराठीवरील इतर मालिकांचे कलाकार यावर्षी डोंबिवलीच्या नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी होणार आहोत आणि नंतर मालिकेतील माझ्या सहकलाकारांसोबत सेटवरच पाडवा साजरा करणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी शूटिंग असणार तर सेटवरच सगळी तयारी आहे."

4 / 5
मीरा वेलणकर म्हणजेच 'शिवा' मालिकेतील सीताईने सांगितलं, "गुढीपाडवा हा सण मी कुटुंबीयांसोबत साजरा करणार आहे. मला 12 वर्षांचा  मुलगा आहे. त्याला  आपल्या संस्कृती, परंपरा कळाव्यात  म्हणून  मी सण आवर्जून साजरं करते. हल्ली आपण  खूप  वेगवान आयुष्य जगत  आहोत  आणि  म्हणूनच  आचारपद्धतीच्या  मागचा अर्थ  समजून  घेऊन  सण  साजरा  करावा  हा  माझा सर्वांना  आग्रह आहे. त्यामुळे  गोष्टी  अर्थपूर्ण  होतात. कुठलीही  गोष्ट  साजरी  करायची  तर  गोड -धोड  तर हवंच. या  वर्षी आमच्याकडे  आमरस  पुरीचा  बेत  आहे."

5 / 5
Follow us
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.