Masaba Gupta | मुलीच्या लग्नाला विवियन रिचर्ड्सचीही हजेरी; मसाबा गुप्ताचं संपूर्ण कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

या फोटोमध्ये नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स एकाच फ्रेममध्ये दिसल्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं. नीना आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचं नातं ८०च्या दशकात फार चर्चेत होतं.

| Updated on: Jan 27, 2023 | 5:13 PM
अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली.  27 जानेवारी रोजी पार पडलेल्या या लग्नाला फक्त कुटुंबीयच उपस्थित होते. यावेळी मसाबाचे वडील विवियन रिचर्ड्स, सावत्र वडील विवेक मेहरा, आई नीना गुप्ता, सत्यदीपची आई आणि बहीण एकाच फ्रेममध्ये दिसले.

1 / 5
मसाबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फॅमिली फोटो पोस्ट केला. 'पहिल्यांदाच माझं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आहे. एकमेकांत मिसळलेला माझा सुंदर परिवार. इथून पुढे जे काही मिळेल ते सर्व बोनस', असं कॅप्शन देत मसाबाने हे फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
या फोटोमध्ये नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स एकाच फ्रेममध्ये दिसल्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं. मसाबा ही नीना आणि विवियन यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. मात्र या दोघांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

3 / 5
सत्यदीप आणि मसाबा हे 'मसाबा मसाबा' या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये एकत्र दिसले होते. मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी सत्यदीपने वकील म्हणून काम केलं. त्याने बॉम्बे वेल्वेट, नो वन किल्ड जेसिका, फोबिया आणि विक्रम वेधा यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

4 / 5
नीना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या नात्याविषयीही त्यांनी विविध मुलाखतींमध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत. विवियनशी लग्न जरी केलं नसलं तरी नीना यांनी मसाबा आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.