MC Stan | एमसी स्टॅनच्या बॉलिंगवर सचिन तेंडुलकरची बॅटिंग; व्हिडीओ पाहून चाहते खुश!

बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर एमसी स्टॅनने त्याचं टूर जाहीर केलं. 7 मे रोजी त्याचा हा टूर संपणार आहे. आतापर्यंत त्याने पुणे, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि इंदौरमध्ये परफॉर्म केलंय.

MC Stan | एमसी स्टॅनच्या बॉलिंगवर सचिन तेंडुलकरची बॅटिंग; व्हिडीओ पाहून चाहते खुश!
MC Stan and Sachin TendulkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 9:36 AM

मुंबई : बिग बॉसचा सोळावा सिझन जिंकल्यानंतर रॅपर एमसी स्टॅनची लोकप्रियता घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला सतत विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलंय. नुकतीच त्याने ‘क्रिकेटचा देव’ मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघंजण क्रिकेटसुद्धा खेळले. एमसी स्टॅनच्या बॉलिंगवर सचिनने बॅटिंग केली. खुद्द रॅपरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सचिनसोबतचे काही फोटोसुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दोघं एका कार्यक्रमादरम्यान क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत. यामध्ये स्टॅन बॉलिंग करत आहे. तर सचिन बॅटिंग करत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘गॉड ऑफ रॅपिंग विथ गॉड ऑफ क्रिकेट’ (रॅपिंगचा देव क्रिकेटच्या देवासोबत) असं एकाने लिहिलंय. तर ‘मी रॅपर नाही, बॉलर आहे’ असं दुसऱ्या युजरने एमसी स्टॅनच्या स्टाइलमध्ये म्हटलंय. ‘एक क्रिकेटचा बादशाह आणि दुसरा हिप हॉप डॉन’ असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच टेनिसपटू सानिया मिर्झाने एमसी स्टॅनला महागडं गिफ्ट पाठवलं होतं. या गिफ्ट्सचा फोटो त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. त्या गिफ्ट बॉक्समध्ये शूज आणि गॉगल्स पहायला मिळाले होते. या दोन्हींची किंमत जवळपास 91 हजार रुपये आहे. सानियाने स्टॅनला भेट म्हणून दिलेल्या गॉगल्सची किंमत जवळपास 30 हजार रुपये इतकी आहे. बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर एमसी स्टॅनने फराह खानच्या पार्टीत सानियाची भेट घेतली होती. त्यावेळी स्टॅनवर सानिया खूप प्रभावित झाली होती. म्हणूनच तिने त्याच्यासाठी महागडे भेटवस्तू पाठवले होते.

View this post on Instagram

A post shared by MC STΔN ? (@m___c___stan)

बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर एमसी स्टॅनने त्याचं टूर जाहीर केलं. 7 मे रोजी त्याचा हा टूर संपणार आहे. आतापर्यंत त्याने पुणे, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि इंदौरमध्ये परफॉर्म केलंय. यापुढे तो नागपूर, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता आणि दिल्लीत परफॉर्म करणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.