Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या मीशाला तीन वर्षाचा तुरुंगवास, तर पाकिस्तानी गायक अली जफरला दिलासा !

पाकिस्तानी गायक अली जफरने (Ali Zafar) बॉलिवूडमधील अनेक हिट गाणे गायली आहेत. तसेच अभिनय क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या मीशाला तीन वर्षाचा तुरुंगवास, तर पाकिस्तानी गायक अली जफरला दिलासा !
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 11:20 AM

मुंबई : पाकिस्तानी गायक अली जफरने (Ali Zafar) बॉलिवूडमधील अनेक हिट गाणे गायली आहेत. तसेच अभिनय क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री मीशा शफीने (Meesha Shafi) अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. परंतू हा आरोप झाल्यानंतर लगेचच अलीने हे सर्व आरोप नाकारले होते. त्यानंतर हे सर्व प्रकरण कोर्टात गेले आणि आता कोर्टाने आपला निकाल दिला आहे. (Meesha Shafi three years jail while Pakistani singer Ali Zafar was release Over Sexual Harrashment)

यामध्ये कोर्टाने मीशाने अलीवर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. यामुळे अलीला कोर्टाकडून या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच अलीने मीशाविरोधात मानहानिचा दावा देखील दाखल केला होता. यावर देखील कोर्टाने निकाल दिला असून आता या प्रकरणात मीशाला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नेमके काय होते प्रकरण मिशाने केलेल्या सर्व आरोपांमुळे अलीची बदनामी होत असल्यामुळे अलीने मिशावर मानहानिचा दावा दाखल केला होता आणि यामुळेच आता मीशाला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मीशाने केलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले तेव्हा तिने अलीकडे माफी मागितली होती असे अलीचे म्हणणे आहे. अलीला मेसेज करून मिशाने माफी मगितली परंतू अलीचे म्हणणे आहे की, जोपर्यंत ती सार्वजनिकपणे माफी मागणार नाही तोपर्यंत मिशाला माफ करणार नाही.

मिशाने मीटू मोहिमेदरम्यान अली जफरवर आरोप केले होते. मीशाच्या म्हणण्यानुसार अलीने रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये लैंगिक शोषण केले होते. मिशा म्हणाली होती की, “अली जफरच्या सासरवाडीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त ती आपल्या पतीसोबत गेली होती आणि अलीने तेंव्हाच लैंगिक शोषण केले होते.”

अलीच्या करिअरची सुरूवात अलीने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात पाकिस्तानी टेलीविजनपासून केली आहे. त्यानंतर तो भारतात आला. येथे अभिषेक शर्मा दिग्दर्शित तेरे बिन लादेन या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र, म्हणावा तसा हा चित्रपट हिट होऊ शकला नाही पण अलीने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती.

या चित्रपटाच्या अभिनयासाठी अलीला अनेक पुरस्कारांसाठी नामांकनही देण्यात आले होते. त्यानंतर तो यशराज फिल्म्सच्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटात कतरिना कैफ आणि इम्रान खानसोबत दिसला होता. या चित्रपटासाठी 2012 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या : 

Sussanne Khan | आधी हृतिकसोबत घटस्फोट, आता अली गोनीच्या भावाला डेट करतेय सुझान खान!

Rhea Chakraborty  | ‘चेहरे’च्या पोस्टरवरून रियाचा चेहरा गायब! अमिताभ आणि इमरान एकटेच करणार प्रमोशन?

Salman vs John | ईदच्या मुहूर्तावर ‘राधे’ आणि ‘सत्यमेव जयते 2’मध्ये टक्कर, कोण ठरेल अव्वल?

(Meesha Shafi three years jail while Pakistani singer Ali Zafar was release Over Sexual Harrashment)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.