Sidhu Moosewala | सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर कधीच लग्न न करण्याचा तिचा निर्णय; कोण आहे अमनदीप कौर?

राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात 27 वर्षीय मूसेवालाचा मृत्यू झाला. सिद्धू त्याच्या जीपमधून जात असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला होता.

Sidhu Moosewala | सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर कधीच लग्न न करण्याचा तिचा निर्णय; कोण आहे अमनदीप कौर?
Sidhu Moosewala's fianceImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 1:16 PM

पंजाब : 29 मे 2022 रोजी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धूच्या मृत्यूला आज (सोमवार) वर्ष पूर्ण झालं. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून सिद्धूची हत्या करण्यात आली होती. सिद्धूच्या मृत्यूचा शोक आजही त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त होतो. सिद्धू मूसेवाला हा सर्वांत प्रभावशाली पंजाबी गायक होता आणि ज्यावेळी त्याची हत्या झाली, त्यावेळी तो करिअरच्या शिखरावर होता. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आणि निवडणूक लढवल्याच्या काही दिवसांनीच बिश्नोई गँगने त्याची हत्या केली होती. सिद्धूचे कुटुंबीय आणि चाहते आजही त्याच्या निधनाच्या दु:खात आहेत. मात्र यांसोबतच सिद्धूच्या जवळची एक व्यक्ती अजूनही त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरली नाही. ती व्यक्ती म्हणजे सिद्धूची होणारी पत्नी अमनदीप कौर.

सिद्धूच्या मृत्यूच्या काही महिन्यांआधीच या दोघांचा रोका पार पडला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये सिद्धू आणि अमनदीप लग्न करणार होते. सिद्धू मुसेवाला आणि अमनदीप कौर हे जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. रोका पार पडल्यानंतर वर्षाअखेरीस दोघं लग्न करणार होते, असं त्याच्या आईने सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

कोण आहे अमनदीप कौर?

अमनदीप कौर आणि सिद्धू मुसेवाला यांची पहिली भेट कॅनडामध्ये झाली होती. अमनदीप ही कॅनडाचीच राहणारी आहे. सिद्धूच्या हत्येच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये दोघं लग्नबंधनात अडकणार होते. अमनदीप ही अकाली दलाच्या एका वरिष्ठ नेत्याची मुलगी आहे. तिने काही महिने सिद्धूची सहकारी म्हणूनही काम केलं होतं. ती मूळची पंजाबमधील सांगरेरी जिल्ह्याची आहे. तिच्याच गावी सिद्धू आणि अमनदीपचा साखरपुडा पार पडला होता.

अमनदीप सिद्धूच्या मृत्यूच्या धक्क्यातून आजही सावरली नाही. त्याच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी भविष्यात कधीच लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे. सिद्धूच्या निधनानंतर ती त्याच्या कुटुंबीयांसोबत मनसा जिल्ह्यात राहत असल्याचं कळतंय.

राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात 27 वर्षीय मूसेवालाचा मृत्यू झाला. सिद्धू त्याच्या जीपमधून जात असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. सिद्धूने 2017 मध्ये संगीतविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याचे अनेक म्युझिक अल्बम गाजले. ‘लेजंड’, ‘सो हाय’, ‘द लास्ट राइड’ यांसारख्या त्याच्या गाण्यांना चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला. सिद्धूच्या मृत्यूनंतर आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. ‘एसवायएल’ या गाण्याने अनेक विक्रम मोडले होते. तो राजकारणातही सक्रिय होता. सिद्धूने मानसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ‘आप’चे डॉ. विजय सिंगचा त्याने पराभव केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी मूसेवालाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.