Kedarnath | केदारनाथमध्ये घोड्याला बळजबरीने पाजली गांजाची सिगारेट; रवीना टंडनकडून अटकेची मागणी

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या 27 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दोन पुरुष घोड्याच्या नाकपुडीत बळजबरीने गांजाची सिगारेट टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. एका व्यक्तीने घोड्याची नाकपुडी बंद करून त्याचं तोंड हाताने झाकलं आहे.

Kedarnath | केदारनाथमध्ये घोड्याला बळजबरीने पाजली गांजाची सिगारेट; रवीना टंडनकडून अटकेची मागणी
Raveena TandonImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 10:35 AM

उत्तराखंड : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. असंख्य भाविक या पवित्र धामच्या दर्शनासाठी तिथे पोहोचतात. याठिकाणी भाविकांसाठी घोडा आणि खच्चर यांच्या स्वारीची व्यवस्था करण्यात येते. ज्या लोकांना मंदिरापर्यंत वर चढता येत नाही किंवा थकून जातात, त्यांच्यासाठी ही व्यवस्था असते. घोडा किंवा खच्चरच्या पाठीवर स्वार होऊन भाविक त्यांची केदारनाथ धाम यात्रा पूर्ण करतात. मात्र याच पवित्र धामामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये दोन लोकं एका घोड्याला बळजबरीने गांजाची सिगारेट पाजताना दिसत आहेत. या गंभीर घटनेवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर आता अभिनेत्री रवीना टंडनची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रवीनाने व्यक्त केला संताप

रवीनाने घोड्याचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लिहिलं, ‘आपल्या पवित्र ठिकाणी घोड्यांवर सततच्या होणाऱ्या अत्याचाराला आपण थांबवू शकतो का? अशा निरपराध प्राण्यांवर अत्याचार करून ही लोकं कोणती प्रार्थना करत आहेत, कोणते कर्म मिळवत आहेत? हा केदारनाथचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या लोकांना अटक करता येईल का’, असा सवाल तिने केला आहे.

हे सुद्धा वाचा

उत्तराखंड पोलिसांनी घेतली दखल

उत्तराखंड पोलिसांनी शुक्रवारी या वादग्रस्त व्हिडीओची दखल घेतली. ‘आम्ही या व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे, ज्यामध्ये एका घोड्याला बळजबरीने सिगारेट पाजली जात आहे. या व्हिडीओतील दोन तरुणांची ओळख पटवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती उत्तराखंड पोलिसांनी ट्विटद्वारे दिली. त्याचसोबत त्यांनी नागरिकांना आवाहनसुद्धा केलं आहे. ‘अशा घटनांची माहिती ड्युटीवर असलेल्या जवळच्या पोलिसांना त्वरित द्यावी किंवा तात्काळ कारवाईसाठी 112 वर संपर्क साधावा’, असं त्यांनी पुढे लिहिलं.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या 27 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दोन पुरुष घोड्याच्या नाकपुडीत बळजबरीने गांजाची सिगारेट टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. एका व्यक्तीने घोड्याची नाकपुडी बंद करून त्याचं तोंड हाताने झाकलं आहे. तर दुसऱ्याने गांजाची सिगारेट नाकात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काही सेकंदांनंतर घोड्याच्या नाकपुडीतून धूर येताना दिसतो. त्यानंतर पुन्हा ती लोकं बळजबरीने सिगारेट पाजतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.