Milind Soman | क्रू मेंबरला मिलिंद सोमणने दिली अशी वागणूक; नेटकरी म्हणाले ‘जरा तरी दया कर!’

मिलिंद सोमण नेहमीच वर्कआऊट रुटीन आणि आहाराचे विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. शहरी जीवनातील गोंधळापासून दूर निसर्गरम्य वातावरणात धावताना, सायकल चालवताना तर कधी पुशअप्स करतानाचे फोटो आणि व्हिडीओ मिलिंद इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो.

Milind Soman | क्रू मेंबरला मिलिंद सोमणने दिली अशी वागणूक; नेटकरी म्हणाले 'जरा तरी दया कर!'
Milind SomanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 1:06 PM

मुंबई | 25 जुलै 2023 : अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी विशेष ओळखला जातो. एखाद्या चाहत्याला त्याच्यासोबत फोटो किंवा सेल्फी काढायचा असेल तर त्यासाठी तो त्यांना पुशअप्स करण्यास सांगतो. याचा अनेकदा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. मिलिंद सध्या त्याच्या आगामी ‘वन फ्रायडे नाइट’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या टीममधील एका क्रू मेंबरने मिलिंदसोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मिलिंदने त्यालासुद्धा पुशअप्स करायला लावले. हा व्हिडीओ खुद्द मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. मात्र याच व्हिडीओवरून मिलिंदला नेटकरी खूप ट्रोल करत आहेत. पावसाने ओल्या झालेल्या आणि दगडी असलेल्या रस्त्यावर त्याला पुशअप्स करायला लावल्याने नेटकरी मिलिंदवर टीका करत आहेत.

‘वन फ्रायडे नाइट’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीही इन्स्टाग्रामवर मिलिंदचा हा व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये क्रू मेंबर ओल्या आणि खडकाळ जमिनीवर पुशअप्स करताना दिसतोय. तर मिलिंद सोमण त्याच्या आजूबाजूला फिरतोय. तो पुशअप्स योग्य पद्धतीने करतोय की नाही हे मिलिंद तपासतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ओल्या आणि खडकाळ जमिनीवर तो त्याला पुशअप्स करायला कसं सांगू शकतो?’, असा सवाल एकाने केला. तर ‘मिलिंदने जरा तरी त्याचा विचार करावा’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

याआधीही त्याने चाहत्यांना फोटो किंवा सेल्फीच्या बदल्यात 10 पुशअप्स करण्यास सांगितलं होतं. त्याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्यायामाच्या बाबत प्रत्येकाने सजग राहावं, हा त्यामागचा उद्देश असल्याचं मिलिंदने स्पष्ट केलं होतं.

मिलिंद सोमण नेहमीच वर्कआऊट रुटीन आणि आहाराचे विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. शहरी जीवनातील गोंधळापासून दूर निसर्गरम्य वातावरणात धावताना, सायकल चालवताना तर कधी पुशअप्स करतानाचे फोटो आणि व्हिडीओ मिलिंद इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. केवळ मिलिंद सोमणच नाही तर त्याची पत्नी अंकिता कोनवार आणि आई उषा सोमण यासुद्धा फिटनेसच्या बाबतीत जागरूक असतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.