AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई-बाबा कधी बनणार?’, कुटुंब नियोजनाच्या प्रश्नावर मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवरचं बेधडक उत्तर!

बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. अंकिता आणि मिलिंद ‘कपल गोल्स’ बरोबरच ‘फिटनेस गोल्स’ देखील देत असतात.

‘आई-बाबा कधी बनणार?’, कुटुंब नियोजनाच्या प्रश्नावर मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवरचं बेधडक उत्तर!
अंकिता आणि मिलिंद
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 1:08 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. अंकिता आणि मिलिंद ‘कपल गोल्स’ बरोबरच ‘फिटनेस गोल्स’ देखील देत असतात. अंकिता कोंवरने नुकत्याच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर गप्पा मारल्या. मात्र, या गप्पांदरम्यान अंकिताला चाहत्यांच्या अनेक विचित्र प्रश्नांना उत्तर द्यावी लागली होती (Milind Soman wife Ankita Konwar gives an epic reply to fan on family planning question).

इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन दरम्यान एका व्यक्तीने अंकिताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारले. ज्यास अंकितानेही अगदीच न डगमगता उत्तर दिले आहे. तिच्या या बेधडक उत्तराने चाहते देखील खुश झाले आहेत.

अंकिता-मिलिंद कधी होणार ‘पालक’?

इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन दरम्यान एका वापरकर्त्याने विचारले की, ‘तुमच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. तुम्ही कुटुंब नियोजनाबद्दल काय विचार करता?’ या प्रश्नावर उत्तर देताना अंकिताने लिहिले की, ‘आम्ही आधीच एक नियोजित कुटुंब आहोत. आता पुढे…’ याचाच अर्थ या दोघांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले आहे. मात्र, तिच्या या उत्तराने प्रश्न विचारणाऱ्याची बोलती नक्कीच बंद झाली आहे.

मात्र, लगेच त्यानंतर दुसर्‍या वापरकर्त्याने अंकिताला विचारले की, ‘भारतीय रूढीवादी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी लग्न करत नाही, मग या गोष्टी कशा व्यवस्थापित करता?

यावर उत्तर देताना अंकिताने लिहिले की, ‘समाजात जे काही सामान्य नाही, त्याबद्दल लोक बर्‍याचदा बोलू इच्छित असतात. हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही. आपल्या मानवांना अज्ञात गोष्टींवर विचित्र प्रतिक्रिया देण्याची सवय आहे. हे जगण्याची कौशल्य आहे. काहीवेळा आपण युटीलिटी आणि कचरा यातील फरक समजण्यास असक्षम असतो. मी नेहमीच अशा गोष्टी केल्या आहेत, ज्यांनि मला आनंद होतो..’

पाहा पोस्ट :

Ankita Konwar

अंकिताचे उत्तर

अंकिता-मिलिंदच्या लग्नाची चर्चा

अंकिता कोंवर आणि मिलिंद सोमण यांचे 22 एप्रिल 2018 रोजी अलिबागमध्ये लग्न झाले. या खाजगी समारंभात केवळ काही जवळचे लोक उपस्थित होते. अंकिता आणि मिलिंद यांनी जुलै 2019 मध्ये स्पेनमध्ये एक ‘बेअर फूट वेडिंग’ही केली होती. अंकिता आणि मिलिंद दोघांही फिटनेसची आवड आहेत. नेहमीच ते वर्कआउट करताना आणि एकत्र धावताना दिसतात. सोशल मीडियावरही या जोडीच्या फोटोंची चर्चा आहे.

(Milind Soman wife Ankita Konwar gives an epic reply to fan on family planning question)

हेही वाचा :

Sushant Singh Rajput | चित्रपट बनणारच! दिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका

Photo : मिथुनची सून मदालसा शर्माची स्पा पार्लरमध्ये धमाल, अनघा भोसलेसोबत फोटो शेअर

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.