‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणला मिताली मयेकरचा टोला; म्हणाली ‘रिॲलिटी शो की..’

Bigg Boss Marathi 5: सूरज चव्हाण याला विजेता घोषित करताच मिताली मयेकरकडून नाराजी व्यक्त, पोस्ट करत म्हणाली 'रिॲलिटी शो की..', 70 दिवसांनंतर 'बिग बॉस मराठी 5' शोचा विजेता घोषित करण्यात आला... पण अनेकांनी व्यक्त केली नाराजी...

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणला मिताली मयेकरचा टोला; म्हणाली 'रिॲलिटी शो की..'
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 10:41 AM

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी 5’ शोने रविवारी विजेत्याचं नाव घोषित करत चाहत्यांचा निरोप घेतला. यांदाच्या पर्वाचा विजेता सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण ठरला. आपल्या झापूक झुपूक अंदाजाच चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या सूरज याने शोची ट्रॉफी स्वतःच्या नावे केली आहे. सूरज विजेता ठरल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी आनंद देखील व्यक्त केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सूरज चव्हाण याची चर्चा रंगली आहे. सूरज विजेता ठरला असून अभिजीत सावंत उपविजेता ठारला आहे. दरम्यान, अभिनेत्री मिताली मयेकर हिने मात्र विजेत्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस मराठी’ पर्व 5 चा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. पण शो अभिजीत सावंत जिंकेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. पण शेवटच्या क्षणी रितेश देशमुख यांनी सूजर चव्हाण याचं नाव घेतल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

मिताली हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला आहे. ‘रिॲलिटी शो की आहे की सिम्पथी?’ सिम्पथी म्हणजे सहानुभूतीची शो… सध्या मिताली हिच्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. फक्त मिताली हिनेच नाही तर, अनेकांनी शोच्या विजेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

सूरज चव्हाण याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला ‘सिम्पथी… सिम्पथी… सिम्पथी…’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आमच्यासाठी विजेता अभिजीत सावंत आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘गुलीगत सिम्पथी किंग…’, ‘सूरज सिम्पथी मिळवून विजेता झाला… ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे…’ असं देखील नेटकरी म्हणत आहेत.

उपविजाता ठरला अभिजीत सावंत

अभिजीत सावंत विजेता ठरेल अशी सर्वत्र चर्चा रंगली होती. पण शेवटच्या क्षणी सूरज याच्या नावाची घोषणा झाली. उपविजेता ठरल्यानंतर अभिजीत सावंत याला 1 लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘बिग बॉस मराठी 5’ चे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'.
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का.
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.