मिथिला पालकरवर कोसळला दु:खाचा डोंगर; सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना
अभिनेत्री (Marathi Actress) मिथिला पालकरच्या (Mithila Palkar) आजोबांचं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. 26 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजोबांच्या निधनानंतर मिथिलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आजोबांसोबतचे काही फोटोसुद्धा तिने पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री (Marathi Actress) मिथिला पालकरच्या (Mithila Palkar) आजोबांचं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. 26 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजोबांच्या निधनानंतर मिथिलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आजोबांसोबतचे काही फोटोसुद्धा तिने पोस्ट केले आहेत. मिथिलाचा तिच्या आजी-आजोबांवर आणि त्यांचाही तिच्यावर खूप जीव असल्याचं वेळोवेळी तिने मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियाद्वारे सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून ती त्यांच्यासोबतच राहत होती. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि कलाकारांनी आजोबांना श्रद्धांजली वाहिली. (Mithila Palkar Grandfather)
मिथिलाची पोस्ट-
‘09.02.1928-26.03.2022. माझ्या विश्वाचा केंद्रबिंदू आणि मला सर्वाधिक प्रोत्साहन देणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वी आम्हाला सोडून गेले. त्यांच्याशिवाय मला आयुष्य म्हणजे काय माहित नाही आणि कदाचित ते कधीच कळणार नाही. एक गोष्ट मला माहित आहे, ते म्हणजे ते खरे लढवय्ये होते. आयुष्यावर भरभरून प्रेम करणारे होते. त्यांची हीच गोष्ट आम्ही आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करू. ते माझ्यासाठी खूप खास होते आणि नेहमीच माझे नंबर 1 राहतील. जिथे असाल तिथे छान राहा भाऊ. तुमच्या आनंदी हास्याने स्वर्ग आता अधिक आनंदी होईल,’ अशा शब्दांत मिथिलाने भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
मिथिलाच्या या पोस्टवर श्रिया पिळगावकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, सुप्रिया पिळगावकर यांसारख्या कलाकारांनी कमेंट्स करत तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. ‘माझ्या आजी-आजोबांवरही माझा खूप जीव आहे. तू सध्या ज्या भावनांना सामोरं जातेय, त्याची मी कल्पनासुद्धा करू शकणार नाही’, असं श्रियाने लिहिलं. तर आजींची काळजी घे, तुलाही भरपूर प्रेम, असं रेणुका शहाणेंनी म्हटलं.
मिथिला तिच्या आजी-आजोबांसोबत दादरला राहत होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आजोबांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावर त्यांनी मात केली होती. तेव्हासुद्धा मिथिलाने तिच्या भाऊंसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. ‘भाऊंना भरलेलं घर खूप आवडतं. त्यांची श्रवणशक्ती कमी झाली असली तरी ते सर्वांना पाहून स्मितहास्य करत आणि सर्वांशी गप्पा मारत. कोरोनावर मात केल्यानंतर ते मला हसत म्हणाले होते, की मी किमान शंभरी तरी गाठणार. तुला सोडून इतक्या लवकर कुठेच जाणार नाही’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
हेही वाचा:
पतीच्या कॅन्सरविषयी बोलताना इन्स्टाग्राम LIVE दरम्यान अभिज्ञा झाली भावूक; म्हणाली..