‘द केरळ स्टोरी’सारखी केस, धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा मॉडेलचा आरोप; प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी

काही दिवसांपूर्वी अजमत अचानक तिच्या घरी आला आणि तिला मारहाण करू लागला. मारहाणीनंतर त्याने तिचं शारीरिक शोषण केलं आणि त्याचाही व्हिडीओ शूट केला. मॉडेलने केलेल्या या सर्व आरोपींना अजमतने फेटाळलं आहे.

'द केरळ स्टोरी'सारखी केस, धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा मॉडेलचा आरोप; प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 12:55 PM

नवी दिल्ली : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात दाखवलंय की कशा पद्धतीने हिंदू आणि ख्रिश्चन महिलांचं धर्म परिवर्तन करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं. धर्मपरिवर्तनाशी संबंधित असंख्य घटना समोर येत असतात. आता दिल्लीतल्या एका मॉडेलने असा आरोप केला आहे की 2017 पासून एका मुस्लिम व्यक्तीकडून तिच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला जात आहे. या मॉडेलने अजमत नावाच्या व्यक्तीवर हा आरोप केला आहे. संबंधित मॉडेलने पोलिसांकडे याविषयी तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला ‘मिस इंडिया परफेक्शनिस्ट’चा किताब जिंकली होती आणि आरोपी एक तबला वादक आहे, जो दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरात राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

2016 मध्ये झाली होती भेट

पीडित मॉडेल ही शीख धर्माची आहे. तिच्या पतीचं निधन झालं असून तिला एक मुलगासुद्धा आहे. पतीच्या निधनानंतर ती तिच्या आईसोबत राहते. मॉडेलचा भाऊ आणि वडीलसुद्धा या जगात नाहीत. 2016 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून त्या मुस्लिम व्यक्तीच्या संपर्कात आल्याचं मॉडेलने सांगितलं आहे. त्या व्यक्तीचं नाव अजमत अली असं आहे. पीडित महिला कथ्थकचं प्रशिक्षण घेत होती आणि अजमत तिच्या गुरूंच्या फ्रेंड लिस्टमध्ये होता. 2017 मध्ये दोघं एकमेकांच्या संमतीने रिलेशनशिपमध्ये आले. त्यावेळी अजमतने प्रायव्हेट व्हिडीओ शूट केल्याचा आरोप मॉडेलने केला आहे.

मॉडेलकडून धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप

रिलेशनशिपमध्ये असल्यापासून अजमतने सतत मुस्लिम धर्म स्वीकारण्याबद्दल दबाव टाकल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. मात्र लग्नानंतरही शीख धर्मातच राहणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. मात्र तो सतत तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी, बुरखा घालण्यासाठी दबाव टाकत होता. या दबावामुळे मॉडेलने त्याच्याशी लग्नाचा नकार दिला होता. त्यानंतर अजमतने तिला धमकी देण्यास आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ लीक करण्याची त्याने धमकी दिली.

हे सुद्धा वाचा

अजमतने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचाही आरोप संबंधित मॉडेलने केला आहे. त्याने तिच्या मुलाला मारण्याची धमकी दिली होती. म्हणून भीतीपोटी त्याने जेव्हा जेव्हा बोलावलं, तेव्हा त्याच्याकडे गेल्याचा खुलासा पीडित मॉडेलने केला. काही दिवसांपूर्वी अजमत अचानक तिच्या घरी आला आणि तिला मारहाण करू लागला. मारहाणीनंतर त्याने तिचं शारीरिक शोषण केलं आणि त्याचाही व्हिडीओ शूट केला. मॉडेलने केलेल्या या सर्व आरोपींना अजमतने फेटाळलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.