Mohabbatein सिनेमातील प्रिती झंगियानी आठवतेय; सध्या काय करते अभिनेत्री?

Mohabbatein | एकेकाळी शिफॉनच्या ओढणीत 'मोहब्बतें' फेम प्रिती हिने केलं चाहत्यांच्या मनावर राज्य, पण सध्या कुठे आहे अभिनेत्री? सध्या सर्वत्र प्रिती म्हणजे 'मोहब्बतें' सिनेमातील किरण हिचीच चर्चा...

Mohabbatein सिनेमातील प्रिती झंगियानी आठवतेय; सध्या काय करते अभिनेत्री?
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 12:34 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : ९० च्या दशकातील पिढी ‘मोहब्बतें’ सिनेमाला कधीच विसरू शकत नाही. प्रेमाची खरी व्यख्या सांगणारा ‘मोहब्बतें’ सिनेमाने तुफान गाजला. ‘मोहब्बतें’ हीट ठरल्यामुळे सिनेमातील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमातील काही डायलॉग, सीन प्रामुख्याने गाणी आजही तुफान चर्चेत असतात. सिनेमातील गाणी आजही चाहते प्रवास किंवा निवांत वेळेत ऐकत असतात. सिनेमातील अभिनेत्री प्रिती झंगियानी हिने देखील एकेकाळी शिफॉनच्या ओढणीत आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. सध्या सर्वत्र प्रिती हिची चर्चा रंगत आहे. एककाळ बॉलिवूड गाजवणारी प्रिती आता काय करते, कुठे राहते? अशा अनेक चर्चा रंगत आहेत.

आज प्रिती म्हणजे ‘मोहब्बतें’ सिनेमातील किरण हिचा आज वाढदिवस आहे. प्रिती आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. १८ ऑगस्ट १९८० साली प्रिती झाला जन्म झाला. अभिनेत्रीने तिच्या करियरची सुरुवात मॉडलिंग पासून केली.

मॉडेलिंगदरम्यानच तिला राजश्री प्रॉडक्शनच्या ‘छूई मुई सी तुम’ या म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर प्रिती हिला अनेक जाहिराती देखील मिळाल्या. ‘नीमा सँडल सोप’मधून प्रितीला खूप प्रसिद्धी मिळाली. जाहिरातींमध्ये झळकल्यानंतर अभिनेत्रीला सिनेमांमध्ये देखील अभिनय करण्याची संधी मिळाली.

१९९९ मध्या प्रिती हिला ‘माझविल्ला’ या मल्याळम सिनेमात पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. त्याच वर्षी प्रीतीने ‘थम्मुडू’ या तेलुगू सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मल्याळम तेलुगू सिनेमात भूमिका साकारल्यानंतर प्रितीला ‘मोहब्बतें’ हा पहिला बॉलिवूड सिनेमा मिळाला.

‘मोहब्बतें’ चित्रपटात पांढऱ्या सूट आणि शिफॉनच्या ओढणीत दिसणाऱ्या प्रितीने एका साध्या विधवा मुलीची भूमिका साकारून लोकांच्या मनात घर केलं. ‘मोहब्बतें’ सिनेमानंतर प्रितीला अन्य सिनेमामध्ये देखील भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण तिला यश मिळालं नाही.

‘मोहब्बतें’ सिनेमानंतर अभिनेत्रीने ‘आवारा पागल दीवाना’ , ‘चांद के पार चलो’, ‘वाह! तेरा क्या कहना’, ‘एलओसी कारगिल’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं. पण तिला यश मिळालं नाही. अखेर अभिनेत्रीने अभिनय विश्वाचा निरोप घेतला आणि लग्न केलं. सध्या अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

बॉलीवूडमध्ये यश न मिळाल्यानंतर प्रितीने २००८ मध्ये मॉडेल आणि अभिनेता प्रवीण दाबाससोबत लग्न केले. यानंतर २०११  मध्ये प्रीतीने मुलगा जयवीरला जन्म दिला. आता प्रीती दोन मुलांची आई आहे. अभिनयापासून दूर असलेली प्रीती सध्या मुंबईतील वांद्रे येथे कुटुंबासोबत राहते.

प्रीती आता सिनेमांमध्ये दिसत नसली तरी आजही ती तितकीच सुंदर आणि फिट दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर प्रितीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.