मोहम्मद शमी याच्या बायकोच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Hasin Jahan : मोहम्मद शमी याला सोडल्यानंतर हसीन जहाँ नव्या पुरुषाच्या प्रेमात? क्रिकेटपटूच्या पत्नीचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि आणि मोहम्मद शमी याच्या बायकोच्या व्हिडीओची चर्चा...

मोहम्मद शमी याच्या बायकोच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 2:22 PM

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्या पत्नी हसीन जहाँ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर वर्ल्ड कप 2023 मध्या मोहम्मद शमी याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली होती. विश्वचषकादरम्यान शमीसोबत त्याची पत्नी हसनीही चर्चेत होती. हसीन कायम मोहम्मद शमी याच्याबद्दल वक्तव्य करत असल्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर कायम हसीन चर्चेत असते. आता देखील हसीन हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हसीन एका बॉलिवूड गाण्यावर व्हिडीओ बनवताना दिसत आहे.

हसीन जहाँ हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये हसीन हिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. व्हिडीओमध्ये हसीन ‘तलाश’ सिनेमातील ‘दिल ले गया परदेसी कोई रोकना था…’गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. ‘दिल ले गया परदेसी कोई रोकना था…’ गाणं अभिनेत्री करीना कपूर हिच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

हसीन हिच्या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ज्या फोनमधून रील्स बनवत आहे, तो फोन देखील शमी याने गिफ्ट दिला आहे..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘शमीची माफी माग, तो माफ करेल… त्याचं मन फार मोठं आहे..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांची चर्चा रंगली आहे.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, मोहम्मद शमी याच्यासोबत हसीन जहाँ हिचं दुसरं लग्न आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांची पहिली ओळख 2012 मध्ये झाली होती. कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हसीन जहाँ आणि शमी यांना एक मुलगी देखील आहे.

सांगायचं झालं तर, जेव्हा दोघांची ओळख झाली तेव्हा हसीन जहाँ केकेआर संघासाठी चीअरलीडर मॉडेल म्हणून काम करत होती. हसीन जहाँ एक प्रसिद्ध मॉडेल आहे. मॉडेलींग क्षेत्रातून हसीन जहाँ अफाट पैसा कमावते. सोशल मीडियावर हसीन कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.