Mohammed Shami याच्या बायकोचा पहिला नवरा कोण? दोन मुलांच्या जन्मानंतर सोडली साथ, त्यानंतर…

Mohammed Shami : पहिल्या लग्नानंतर कसं होतं हसीन जहाँ हिचं आयुष्य, दोन मुलांच्या जन्मानंतर सोडली पहिल्या पतीची साथ; दुसरा पती मोहम्मद शमी याच्यासोबत देखील वाद..., सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या हसीन जहाँ हिच्या खासगी आयुष्याची सर्वत्र चर्चा...

Mohammed Shami याच्या बायकोचा पहिला नवरा कोण? दोन मुलांच्या जन्मानंतर सोडली साथ, त्यानंतर...
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 1:36 PM

मुंबई | 1 डिसेंबर 2023 : भारतील क्रिकेटसंघाचा दमदार क्रिकेटपटू मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने पती आणि सासरच्या मंडळींवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमी याच्यासोबत हसीन हिचं दुसरं लग्न आहे. अशात हसीन हिचा पहिला पती कोण आहे? पहिल्या पतीसोबत हसीन हिने विभक्त होण्याचा का निर्यण घेतला? याची चर्चा कायम रंगलेली असते. हसीन हिने दोन मुलांच्या जन्माच्या नंतर पहिल्या पतीची साथ सोडली आणि शमी याच्यासोबत लग्न केलं. पण शमी याच्यासोबत देखील हसीन हिचं वैवाहिक आयुष्य अपयशी ठरलं.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हसीन हिच्या दोन लग्नाबद्दल चर्चा रंगली आहे.

हसीन जहाँ हिचा पहिला पती…

हसीन जहाँ हिचं पहिलं लग्न 2002 मध्ये झालं होतं. किराणा दुकानदारासोबत हसीन हिने लग्न केलं होतं. 2002 मध्ये हसीन हिने प्रियकर सैफुद्दीन याच्यासोबत लग्न केलं. दोघे 2010 पर्यंत एकत्र राहिले. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, हसीन हिला पुढे शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण सासरच्या मंडळींचा नकार असल्यामुळे हसीन जहाँ हिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

हसीन आणि सैफुद्दीन यांना दोन मुलं आहेत. पहिल्या घटस्फोटानंतर हसीन हिने केकेआर टीममध्ये प्रवेश केला. क्रिकेटच्या मैदानावर हसीन हिने चिअर गर्ल म्हणून करियरला सुरुवात केली. 2012 मध्ये हसीन आणि शमी यांची ओळख झाली. तेव्हापासून शमी आणि हसीन यांची लव्हस्टोरी सुरु झाली. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

2015 मध्ये शमी आणि हसीन यांनी जगात लेकीचं स्वागत केलं. हसीन हिने तिच्या पहिल्या लग्नाचं सत्य शमीपासून लपवून ठेवलं होतं. त्यानंतर दोघांचे वाद वाढल्याच्या चर्चा रंगल्या. हसीन हिने पतीवर फसवणुकीसह अनेक गंभीर आरोप केले. तेव्हापासून शमी आणि हसीन विभक्त राहात आहेत. क्रिकेटच्या मैदानावर मोहम्मद शमी याने अनेक विक्रम रचले पण क्रिकेटपटूला त्याच्या खासगी आयु्ष्यात अनेक अडचणींचा सामना कराला लागला आहे. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ कायम पतीवर गंभीर आरोप करताना दिसते.

हसीन जहाँ एक मॉडेल आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मॉडेलिंगच्या माध्यमातून हसीन जहाँ गडगंज पैसा कमावते. सांगायचं झालं तर वर्ल्ड कप 2023 मध्या मोहम्मद शमी याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली होती. विश्वचषकादरम्यान शमीसोबत त्याची पत्नी हसनीही चर्चेत होती.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.