Adipurush | ‘जिथे श्रीराम, तिथे हनुमान’; ‘आदिपुरुष’च्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये पोहोचला वानर

आदिपुरुष हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. प्रदर्शनापूर्वीच बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त रकमेची कमाई या चित्रपटाने केली आहे. ‘आदिपुरुष’ने नॉन-थिएट्रिकल रेव्हेन्यूद्वारे 247 कोटी रुपयांची कमाई केल्याचं कळतंय.

Adipurush | 'जिथे श्रीराम, तिथे हनुमान'; 'आदिपुरुष'च्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये पोहोचला वानर
Monkey appears while Adipurush screeningImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 12:17 PM

मुंबई : ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो चित्रपट आज (16 जून) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र सोशल मीडियावर तेवढीच क्रेझसुद्धा पहायला मिळाली. रामायणाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंह, सैफ अली खान, देवदत्त नागे, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे यांच्या भूमिका आहेत. अभिनेता देवदत्त नागेनं यामध्ये बजरंगची भूमिका साकारली आहे. प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच आदिपुरुषच्या टीमने एक घोषणा केली होती. चित्रपटाच्या प्रत्येक शोदरम्यान थिएटरमधील एक जागा बजरंग बलीसाठी राखीव ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या शोदरम्यान एका थिएटरमध्ये चक्क वानरच घुसल्याची घटना घडली आहे.

सध्या ट्विटरवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान एका थिएटरमध्ये वानर आल्याचा हा व्हिडीओ पहायला मिळतोय. थिएटरमधील एका बाजूला डोकं वर करून तो स्क्रिनकडे पाहत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. तर दुसरीकडे थिएटरमधील प्रेक्षक ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. साक्षात हनुमानजी श्रीराम यांना भेटायला आले आहेत, असं एकाने लिहिलंय. तर जिथे श्रीराम तिथे हनुमान, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

‘आदिपुरुष’च्या स्क्रिनिंगदरम्यान हनुमानासाठी एक जागा राखीव

“रामायणाची कथा जिथे जिथे सांगितली जाते, तिथे हनुमान असतात असा आमचा विश्वास आहे. या विश्वासामुळे आम्ही थिएटरमधील एक जागा ही हनुमानासाठी राखीव ठेवणार आहोत. त्या सीटचं तिकिट कोणालाच विकलं जाणार नाही. रामाच्या सर्वांत मोठ्या भक्तासाठी आम्ही हे पाऊल उचलतोय”, असं टीमकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

आदिपुरुष हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. प्रदर्शनापूर्वीच बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त रकमेची कमाई या चित्रपटाने केली आहे. ‘आदिपुरुष’ने नॉन-थिएट्रिकल रेव्हेन्यूद्वारे 247 कोटी रुपयांची कमाई केल्याचं कळतंय. यामध्ये सेटेलाइट राइट्स, म्युझिक राइट्स, डिजिटल राइट्स आणि इतर सहाय्यक अधिकार यांचा समावेश आहे. याशिवाय दक्षिणेत या चित्रपटाची कमाई जवळपास 185 कोटी रुपये होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशा पद्धतीने 432 कोटींची कमाई आधीच झाल्याचं म्हटलं जातंय.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...