सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट; मानलेल्या बहिणीची 5 तास चौकशी

कोण आहे सिद्धूची मानलेली बहीण? हत्येप्रकरणात झाली कसून चौकशी

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट; मानलेल्या बहिणीची 5 तास चौकशी
Sidhu Moosewala and Singer Afsana KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 2:53 PM

नवी दिल्ली-  पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moosewala) हत्येप्रकरणी पंजाबी पार्श्वगायिका अफसाना खानची (Afsana Khan) चौकशी करण्यात आली. अफसाना ही सिद्धूला भाऊ मानायची. नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने (NIA) अफसानाला गँगस्टर टेररिस्ट सिंडिकेट प्रकरणात समन्स बजावले होते. त्यानंतर तिची पाच तास चौकशी करण्यात आली. सिद्धूच्या हत्याप्रकरणात गँगस्टर कनेक्शन समजून घेण्यासाठी NIA ने अफसानाला बरेच प्रश्न विचारले.

सिद्धूच्या हत्येप्रकरणी मध्यंतरीच्या काळात छापे टाकण्यात आले, तेव्हापासून अफसाना ही एनआयएच्या रडारवर आहे. संशयामुळेच केंद्रीय तपास संस्थेने अफसानाला चौकशीसाठी बोलावलं. वैयक्तिक शत्रुत्वामुळे सिद्धूची हत्या झाली होती. त्यामुळे तो नेमका कशामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर होता, याविषयी अफसानाला विचारण्यात आलं.

एनआयएला असाही संशय आहे की सिद्धूच्या हत्याप्रकरणात अफसानाचाही हात असू शकतो. बंबिहा गँग आणि अफसाना यांच्या कनेक्शनचा संशय एनआयएला आहे. बंबिहा आणि लॉरेन्स बिश्नोई गँग हे एकमेकांचे कट्टर वैरी आहेत. सिद्धूच्या हत्येचा आरोप लॉरेन्स बिश्नोईच्या गँगवर करण्यात आला. सिद्धूची बंबिहा गँगशी जवळीक होती, असा संशय बिश्नोई गँगला होता. या गँगस्टर्सचं नेटवर्क उघड करण्यासाठी एनआयएने दोन छापे टाकले होते.

हे सुद्धा वाचा

सिद्धूच्या कुटुंबीयांना अफसानाबद्दल पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर तिची चौकशी करण्यासाठी मनसा पोलिसांनी नोटीस बजावली. 28 वर्षीय सिद्धू मूसेवालाची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या झाली होती. मारेकऱ्यांनी सिद्धूवर 30 राऊंड फायरिंग केली होती. सिद्धूच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहकारी गोल्डी ब्रारने घेतली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.