साऊथच्या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’चा साखरपुडा; RRR फेम रामचरणनेही लावली हजेरी

या खास कार्यक्रमाला RRR फेम अभिनेता रामचरणने पत्नी उपासनासह हजेरी लावली. खुद्द शारवानंदनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, असं लिहित त्याने रक्षितासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

साऊथच्या 'मोस्ट एलिजिबल बॅचलर'चा साखरपुडा; RRR फेम रामचरणनेही लावली हजेरी
Telugu actor SharwanandImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 6:13 PM

हैदराबाद: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शारवानंदने त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींच्या उपस्थितीत शारवानंदने रक्षिताशी साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास कार्यक्रमाला RRR फेम अभिनेता रामचरणने पत्नी उपासनासह हजेरी लावली. खुद्द शारवानंदनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, असं लिहित त्याने रक्षितासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

साखरपुड्याला शारवानंदने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. तर रक्षितानेही त्याच रंगसंगतीची डिझायनर साडी नेसली आहे. रक्षिता ही आंध्रप्रदेशातील एका राजकीय कुटुंबाशी संबंधित आहे. तिचे वडील पसुनूर मधुसूदर रेड्डी हे हायकोर्टातील वकील आहेत. तर रक्षिता ही अमेरिकेत टेक्निकल स्पेशलिस्ट म्हणून काम करते.

हे सुद्धा वाचा

मेगास्टार चिरंजीव यांच्यासोबत ‘थम्स अप’ या ब्रँडची जाहिरात केल्यामुळे शारवानंद प्रकाशझोतात आला होता. आपल्या करिअरमध्ये त्याने चिरंजीवी, व्यंकटेश यांसारख्या दिग्गज तेलुगू अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

शारवानंदने 2004 मध्ये ‘एधो तारीखू’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रामचरण आणि राणा डग्गुबत्ती हे त्याचे क्लासमेट्स होते. गेल्या वर्षी त्याचे ‘आडवाल्लू मीकू जोहरालू’ आणि ‘ओके ओका जिवीतम’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Sharwanand (@imsharwanand)

शारवानंद आणि रक्षिताच्या साखरपुड्याला मेगास्टार चिरंजीवी आणि नागार्जुन यांचं कुटुंब, राणा डग्गुबत्ती, सिद्धार्थ, अदिती राव हैदरी, नितीन, श्रीकांत हे दाक्षिणात्य सेलिब्रिटी उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.