Ani Kay Hava 3 Review : जुई आणि साकेतची ‘कमाल’ केमिस्ट्री, ‘बहार’ आणणारा ठरतोय ‘आणि काय हवं’चा तिसरा सीझन
साकेतचा समजुतदार पणा आणि जुईला नेहमी आनंदीत ठेवण्याचे प्रयत्न हे सगळं मुलींना हवं हवंस वाटणारं आहे. लग्नाच्या 5 वर्षांनंतरही नात्यातला गोडवा टिकवून ठेवण्याचे या दोघांचे प्रयत्न आपलं भरभरुन मनोरंजन करतात. (Ani Kay Hava 3 Review: Jui and Saket's amazing Chemistry)
मुंबई : सध्या नवनवीन मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरीज (Web Series) आपल्या भेटीला येत आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर हा कंटेन्ट आहे. मात्र गेले अनेक दिवस चर्चा होती ती म्हणजे एम एक्स प्लेअरची मराठी वेब सीरीज ‘आणि काय हवं 3‘ची (Ani kay hava 3) या वेब सीरीजसाठी प्रेक्षकांनी प्रचंड वाट बघितली आणि अखेर 6 ऑगस्टला जुई आणि साकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
या भागात काय नवीन
पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यानंतर आता तिसरा सीझन येणार याची सगळ्यांनाच प्रतिक्षा होती. वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘आणि काय हवं 3’ वर्थ वेटेड आहे असं म्हणायला हरकरत नाही. प्रिया बापट आणि उमेश कामत या रिअल लाईफ जोडीत प्रचंड उत्तम काम केलं आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रत्येक कपलला अगदी आपल्यासारखीच असल्याचा भास होईल. महत्त्वाचं म्हणजे ही वेब सिरीज जरी वैवाहिक जीवनावर आधारित असली तरी लग्न न झालेले कपलसुद्धा जुई आणि साकेतच्या आयुष्याला रिलेट करू शकतील.
नात्यातील गोडवा जपण्यासाठी जुई आणि साकेतचे प्रयत्न
साकेतचा समजुतदार पणा आणि जुईला नेहमी आनंदीत ठेवण्याचे प्रयत्न हे सगळं मुलींना हवं हवंस वाटणारं आहे. लग्नाच्या 5 वर्षांनंतरही नात्यातला गोडवा टिकवून ठेवण्याचे या दोघांचे प्रयत्न आपलं भरभरुन मनोरंजन करतात. मात्र हेच प्रयत्न आपल्याला अनेक गोष्टींची जाणीव सुद्धा करुन देतात. प्रत्येक गोष्ट दोघांनी मिळून केली तर ती किती सहज आणि सोपी होते हे ‘आणि काय हवं 3’ मधून आपल्याला कळतं.
लॉकडाऊनमधील प्रवास
लग्न झाल्यावर काय गमती जमती घडतात, नवरा बायको म्हणून दोघांनी एकमेकांना कसं समजून घ्यावं, लग्न झाल्यानंतर आयुष्यात काय गोष्टी बदलतात.. या सगळ्यावर ‘आणि काय हवं’ चा पहिला भाग होता. त्यानंतर दुसऱ्या सिझनमध्ये लग्नाचं तिसरं वर्षं साजरं करत एकमेकांसोबत वेगवेगळ्या भावना या दोघांनी शेअर केल्या. आता सिझन ३ मध्ये जुई आणि साकेतनं लग्नाचा पाच वर्षांचा टप्पा गाठला असून त्यांच्यातील विश्वास, प्रेम आणि थोडा वेडेपणा देशभरातील लॉकडाऊन दरम्यान प्रेक्षकांना त्यांच्या जीवनाची ओळख करून देतो. कामासंबंधित गुंतागुंत सोडवण्यापासून ते अचानक असं वाटेपर्यंत की, आता दैनिक जीवनात नवीन बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. असा अनुभव घेणाऱ्या सर्व जोडप्यांचे नित्याचे जीवन ते आपल्या समोर आणलं आहे. ‘मुरांबा फेम’ वरुण नार्वेकर अगदी उत्तम पद्धतीनं दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
हा सिझन आपल्याला लॉकडाऊनदरम्यानच्या जीवनात घेऊन जाणारा आहे. या काळात अनेकांच्या नातेसंबंधांमध्ये अनेक बदल झाले. आपलं लग्न कधीही अस्थिर होऊ नये आणि आपलं नातं अधिक दृढ होण्यासाठी नवीन छंद जोपासणे किंवा मग एखादा प्रोजेक्ट एकत्र करणे अथवा एखादी अशी गोष्ट जी एकत्र करताना मजा येईल, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधणे खूप महत्वाचे आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर जुई आणि साकेतचे नातंही समृद्ध होत आहे. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढउतारांना ते यशस्वीरित्या सामोरे जात आहेत आणि याच कारणास्तव प्रियानं ही व्यक्तिरेखा साकारली. ती आणि उमेश खऱ्या आयुष्यात यातील काही क्षण जगले आहोत.
संबंधित बातम्या
रितेश देशमुखनं बायकोचं खरं नाव सांगितलं, पण ‘जिनिलिया’चा अर्थ काय?
मुशायरे, कव्वाल्या, कीर्तनांनी गीतकार म्हणून घडवलं; कोण आहेत गीतकार प्रशांत अम्बादे?, वाचा
जेव्हा एका गाण्यामुळे एसडी बर्मन आशा भोसलेंवर नाराज होतात! वाचा ‘छोड दो आँचल’ गाण्याचा किस्सा