Bhoot Police Review : कधी हसवतो तर कधी घाबरवतो सैफ-अर्जुनचा चित्रपट, वाचा कसा आहे ‘भूत पोलीस’?

आज आपण अशा काळात जगत आहोत, ज्यात लोकांचा भुतांवरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. पण आजही बॉलिवूड हॉरर चित्रपटांमध्ये ही कल्पना खूप लागू केला जात आहे. याचे उदाहरण म्हणजे आज रिलीज झालेला ‘भूत पोलीस’ हा चित्रपट आहे. दिग्दर्शक पवन कृपलानी यांचा हा चित्रपट 1990 सारखा आशय सादर करतो.

Bhoot Police Review : कधी हसवतो तर कधी घाबरवतो सैफ-अर्जुनचा चित्रपट, वाचा कसा आहे ‘भूत पोलीस’?
Bhoot Police review
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 3:58 PM

चित्रपट : भूत पोलीस

दिग्दर्शक : पवन कृपलानी

स्टार्स : सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस

Bhoot Police Review : आज आपण अशा काळात जगत आहोत, ज्यात लोकांचा भुतांवरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. पण आजही बॉलिवूड हॉरर चित्रपटांमध्ये ही कल्पना खूप लागू केला जात आहे. याचे उदाहरण म्हणजे आज रिलीज झालेला ‘भूत पोलीस’ हा चित्रपट आहे. दिग्दर्शक पवन कृपलानी यांचा हा चित्रपट 1990 सारखा आशय सादर करतो.

मल्टीस्टारर ‘भूत पोलिस’ मध्ये निर्मात्यांनी कॉमेडी आणि हॉरर दोन्ही एकत्र मिसळण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट आज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

भूत पोलीसची कथा काय आहे?

‘भूत पोलीस’ हा दोन भाऊ आणि दोन बहिणींवर आधारित चित्रपट आहे. विभूती वैद्य (सैफ अली खान) आणि चिरोंजी वैद्य (अर्जुन कपूर) या दोन भावांचे वडील तांत्रिक होते. अशा स्थितीत या दोघांकडे पाच हजार वर्षां पूर्वीचे एक पुस्तक आहे. ज्यामध्ये भूत इत्यादींच्या अधीनतेबद्दल सांगितले गेले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यामुळे विभूतीने आपल्या लहान भावाला वाढवले ​​आहे.

विभूती भुतांवर विश्वास ठेवत नाही, तर त्याचा भाऊ  भूतांवर विश्वास ठेवतो. अशा स्थितीत एके दिवशी धर्मशाळेजवळील सिलावट इस्टेटच्या चहाच्या बागांची शिक्षिका माया (यामी गौतम) भूताच्या जत्रेत पोहोचते. विभूती-चिरोंजीच्या वडिलांनी 27 वर्षांपूर्वी त्यांची इस्टेट एका भूतापासून मुक्त केली होती, ज्याला स्थानिक भाषेत कचकंडी म्हणतात. ती आता परत आली आहे. जेव्हा दोन्ही भाऊ निघतात, तेव्हा मायाची बहीण कनिका (जॅकलिन फर्नांडिस) देखील तिथे असल्याचे उघड होते. त्यानंतर काय होते ते पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

कसा आहे हा चित्रपट?

‘गो काचकांडी गो… गो काचकांडी गो’ चित्रपटात ‘गो कोरोना गो’च्या धर्तीवर तंतोतंत सादर करण्यात आले आहे. सैफचा चित्रपटातील हलका-फुलकापणा खूपच तल्लख आहे, तर अर्जुनचे पात्र गंभीर आहे. तुम्हाला चित्रपटात खूप विनोद पाहायला मिळेल, पण चित्रपटाची कथा खूप कमकुवत दिसते. चित्रपटाच्या कथेचा सैलपणा स्पष्टपणे दिसतो.

दिग्दर्शन आणि अभिनय

चित्रपटात सर्व काही घडल्यानंतरही, दिग्दर्शक चित्रपटात प्रत्येकाला अपेक्षित असलेली जादू टाकू शकलेला नाही. कधीकधी तुम्हाला असेही वाटेल की, 90चे दशक ग्लॅमरस स्वरूपात सादर केले गेले आहे. सैफ आणि अर्जुनने त्यांच्या अभिनयाने मने जिंकली असली तरी, असे वाटते की संपूर्ण चित्रपट या दोन स्टार्सच्या खांद्यावर पेलला आहे.

यामी आणि जॅकलिन यांचा अभिनय कमी पडल्यासारखा वाटतो. मात्र, यामीचे पुरेपूर प्रयत्न दिसत आहेत. दोन नायक, दोन नायिका असूनही, चित्रपटात जास्त रोमान्सची अपेक्षा करू नका. त्याच वेळी, राजपाल यादव एकाच दृश्यातही प्रेक्षकांवर जादू करून गेले आहेत.

हेही वाचा :

Baap Beep Baap : वडील आणि मुलामध्ये मैत्रीचे बंध निर्माण करणारं नवं गाणं, ‘बाप बीप बाप’मधील ‘वय नाही’ प्रेक्षकांच्या भेटीला

Bigg Boss Marathi 3 | दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, ‘बिग बॉस मराठी 3’च्या प्रोमोचा मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.